अजित पवारांना स्मरुण शपथ घेते की... सुनेत्रा पवारांचा शपथविधी कधी, कुठे पार पाडणार? वेळापत्रक समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री मिळणार असून सुनेत्रा पवारांनी होकार दिला, त्यानंतर शपथविधीची तयारी सुरू झाली.
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहे. शपविधीसाठी राजभवनात तयारी सुरू आहे. सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी (Sunetra Ajit Pawar DCM Oath Ceremony) होकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या भावनांचा आदर करून निर्णय घेत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार कळवला आहे. नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुनेत्रा पवारांचा निरोप वरिष्ठ नेत्यांना सांगणार आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर आल्याने उद्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्याच्या होणाऱ्या शपथविधी करिता तातडीची बैठक सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळात कुणाला कुठल्या स्थान द्यायचे या संदर्भात बैठक सुरू झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुनील तटकरे. प्रफुल पटेल चर्चा करणार आहे. त्यांच्या निर्णयानंतर उद्याचा शपथविधीची वेळ ठरवण्यात आली आहे.
advertisement
सुनेत्रा पवारांनी कसा कळवला होकार?
बारामतीत अजित पवारांच्या अस्थिविसर्जनानंतर सुनेत्रा पवार, मुलगा जय पवार, पार्थ पवार आणि रणनीतीकार नरेश अरोरा यांची बैठक झाली. अजित पवार यांनी गत साडे तीन दशकांत जे नंदनवन उभे केले त्याची राखण करण्यासाठी जड अंत:रकरणाने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिल्याचे कळते. सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री मिळणार आहे. सुनेत्रा पवारांनी होकार दिला. त्यानंतर शपथविधीची तयारी सुरू झाली.
advertisement
कधी आणि कुठे होणार शपथविधी?
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. शनिवारी (31 जानेवारी) सुनेत्रा पवार यांचा शपथविधी संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे. राजभवनात हा शपथविधी होणार असून राजभवनातील हालचालींना वेग आला आहे.
सुनेत्रा पवार सक्रिय राजकरणात कधीपासून?
सुनेत्रा पवारांसाठी राजकारण काही नवीन नाही. सक्रीय राजकारणात येऊन त्यांना उणे पुरे दिड वर्ष झाले आहेत. 2024 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. पण पक्षाचं राजकारणाची सगळी सूत्र हे अजितदादांच्या हाती होती. पण आता पक्षाच्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मुख्यमंत्रीपदानंतर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्री दिलं आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 8:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांना स्मरुण शपथ घेते की... सुनेत्रा पवारांचा शपथविधी कधी, कुठे पार पाडणार? वेळापत्रक समोर










