Supriya Sule : 'मी श्रीराम म्हणत नाही तर...'; अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अयोध्येमधल्या पराभवावरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. वारीमधल्या संविधान दिंडीमध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संविधान समता दिंडीला भेट दिली. शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील संविधान समता दिंडीला भेट दिली. या दिंडीला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनीही हजेरी लावली.
'18 वर्ष मी पालखीत चालले, यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही, आस्थेचा विषय आहे. पांडुरग असा एकच देव आहे, जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वत: दर्शन घ्यायला येतो. संविधान आणि आपले संत एकच आहेत. मला एक वर्षापूर्वी असं वाटायचं की आपला देश अंधश्रद्धेकडे निघाला आहे का? पण अयोध्येत त्यांचा पराभव झाला. मी श्रीराम म्हणत नाही तर मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. चुकीच्या राईट विंगला या लोकांनी राजकारणात रिजेक्ट केलं', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
advertisement
बारामती तालुक्यातील पिंपरी येथील ओम साई लक्ष्मी लॉन्स मध्ये पवार कुटुंबाने या दिंडीला भेट दिली. शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, संत तुकाराम महाराजांचे वंशज बापू महाराज मोरेही उपस्थित होते.
ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या समता भूमी फुलेवाडा पुण्यातून मागील सहा वर्षापासून संविधान समता दिंडी निघते, या दिंडीला शरद पवारांनी भेट दिली आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
July 07, 2024 2:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule : 'मी श्रीराम म्हणत नाही तर...'; अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं