आलिशान कारचा सनरुफ ठरला जीवघेणा, ताम्हिणी घाटात महिलेचा दुर्दैवी अंत

Last Updated:

Accident in Tamhini Ghat: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने एक भीषण अपघात झाला आहे. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारमधील एका ४३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18
News18
रायगड: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने एक भीषण अपघात झाला आहे. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारमधील एका ४३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. आलिशान कारला असलेल्या सनरुफमुळेच हा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सनरुफ फुटून दगड कारमध्ये पडल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होतं. ही कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरडीचे मोठे दगड थेट धावत्या कारवर येऊन पडले. दरडीचे दगड कारचे 'सनरुफ' (Sunroof) फोडून थेट कारच्या आतमध्ये पडले. यावेळी कारमध्ये बसलेल्या स्नेहल गुजराती (वय ४३) या महिलेच्या डोक्याला दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
advertisement
अपघात होताच स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा दुर्देवाने त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला.
स्नेहल गुजराती या ४३ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्यामध्ये घाटातील रस्त्यावरून प्रवास करणे किती धोकादायक आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मानगाव पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून, घाटरस्त्यावरील दरडी कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आलिशान कारचा सनरुफ ठरला जीवघेणा, ताम्हिणी घाटात महिलेचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement