तुळजापुरात ड्रग्ज आरोपी भाजपचा नगराध्यक्ष, आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी मिळेल, तानाजी सावंतांचा घणाघात

Last Updated:

Tuljapur Drugs Case: तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूर मध्ये प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल, अशा शब्दात आमदार तानाजी सावंत यांनी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.

तानाजी सावंत-राणा जगजीतसिंह पाटील
तानाजी सावंत-राणा जगजीतसिंह पाटील
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, तुळजापूर: तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्ष केले आहे. त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुढीही देतील, असा घणाघात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी केला. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी आज धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार तानाजी सावंत यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरण आणि मंदिर तोडफोड प्रकरण यावरून भाजप आमदारांना पाटील यांना लक्ष्य केले.

तानाजी सावंत यांचा राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा

तुळजाभवानी मंदिरातील गाभारा तोडफोड प्रकरणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दोषी धरत तानाजी सावंत यांनी जहरी टीका केली. तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं. झक मारायची तर बाहेर हात लावायचा, गाभाऱ्याचे पावित्र्य कशाला भंग करतो, असे म्हणत तानाजी सावंत यांनी राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.
advertisement

ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तुळजापूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभवाचा धक्का दिला. यानिमित्ताने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वरचष्मा पुन्हा दिसून आला. पिंटू गंगणे यांचा ड्रग्ज प्रकरणात थेट समावेश होता. विरोधकांनी या निवडणुकीत ड्रग्जवरून भाजपवर आरोप केले. मात्र मतदारांनी गंगणे यांना साथ दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजापुरात ड्रग्ज आरोपी भाजपचा नगराध्यक्ष, आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी मिळेल, तानाजी सावंतांचा घणाघात
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement