Thane News : 25 लाखाची लाच घेणं भोवलं, ठाण्याचे पालिका आयुक्त शंकर पाटोळेंना पदावरून हटवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे यांच्यावर अतिक्रमण उपायुक्त पदावरून हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे.ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
Thane News : एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोन जणांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या प्रकरणात पाटोळे यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून 10 लाख रूपये घेतल्याचेही तापासात समोर आले होते. यानंतर आता लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे यांच्यावर अतिक्रमण उपायुक्त पदावरून हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे.ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची अतिक्रमण उपायुक्त पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच नौपाडा कोपरी परिमंडळ २ चे उपायुक्त पद देखील पाटोळे यांच्याकडे काढून घेण्यात आले. ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.तसेच पाटोळे यांच्या जागी अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचा पदभार उमेश बिरारी यांच्याकडे सोपवला आहे.
advertisement
ठाणे महापालिकेच्या वर्धापणदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सूरू असतानाच मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ठाणे महापालिका मुख्यालयात संध्याकाळी उशिरा धाड टाकली होती. यावेळी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना अटक केली होती. एका जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 50 लाख रूपयाची लाच मागितल्याचे निष्पण्ण झाले असून त्यापैकी 25 लाख रूपयाचा पहिला हप्ता स्विकारताना शंकर पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर याला पथकाने रंगेहाथ पकडले होते.
advertisement
या कारवाईनंतर हा तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे लाचलुच प्रतिबंध विभागाच्या पथकाने आणखी एकाला आज शुक्रवारी अटक केली होती. सुशांत सुर्वे असे या आरोपीचे नाव होते.
आता या प्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे, महापालिकेतील डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
October 03, 2025 10:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News : 25 लाखाची लाच घेणं भोवलं, ठाण्याचे पालिका आयुक्त शंकर पाटोळेंना पदावरून हटवलं