Zubeen Garg Death : झुबीन गर्गचा अपघात नाही, हत्याच! तपासात बँडमेटचा शॉकिंग जबाब, घातपात केल्याचा आरोप

Last Updated:
Zubeen Garg mysterious death : लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमध्ये झालेल्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पण आता झुबीन यांच्या एका सहकाऱ्याच्या जबाबाने तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे.
1/9
मुंबई : लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमध्ये झालेल्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी आता दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा स्कूबा डायव्हिंगमुळे झालेला अपघात असल्याचं म्हटलं जात होतं, पण आता झुबीन यांच्या एका सहकाऱ्याच्या जबाबाने हे प्रकरण घातपाताच्या दिशेने वळल्याचं स्पष्ट होत आहे.

advertisement
2/9
झुबीन गर्गचा बँडमेट असलेल्या शेखर ज्योती गोस्वामी याने रिमांड नोटमध्ये दिलेल्या जबाबात सनसनाटी दावे केले आहेत. शेखर ज्योती गोस्वामीने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटलं आहे की,
झुबीन गर्गचा बँडमेट असलेल्या शेखर ज्योती गोस्वामी याने रिमांड नोटमध्ये दिलेल्या जबाबात सनसनाटी दावे केले आहेत. शेखर ज्योती गोस्वामीने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटलं आहे की, "झुबीन गर्गचा मृत्यू हा अपघात नसून, त्याला अपघाताचं स्वरूप देण्याचं एक मोठं षडयंत्र होतं."
advertisement
3/9
त्याच्या म्हणण्यानुसार, सिंगापूरमधील ‘पॅन पॅसिफिक हॉटेल’मध्ये सिद्धार्थ शर्माचे वर्तन संशयास्पद वाटत होतं. शेखर याने आरोप केला आहे की, सिद्धार्थ शर्मा याने जबरदस्तीने यॉटचा ताबा घेतला आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घातला.

4/9
या घटनेची गंभीरता वाढवणारा सर्वात मोठा दावा म्हणजे, जेव्हा झुबीन गर्ग पाण्यात बुडत असताना मदतीसाठी तळमळत होता, तेव्हा सिद्धार्थ शर्मा मोठ्याने ओरडत होता, “जाऊ दे, जाऊ दे!”

5/9
गोस्वामीच्या जबाबात अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत. शेखरचा थेट आरोप आहे की, सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंता यांनी झुबीनला विष दिले आणि हा प्रकार लपवण्यासाठी परदेशातील ठिकाण निवडले.

6/9
जेव्हा झुबीनच्या नाक आणि तोंडातून फेस येत होता, तेव्हा शर्माने त्याला ॲसिड रिफ्लक्स म्हणून हिणवले आणि त्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून दिली नाही. या निष्काळजीपणामुळे झुबीनचा मृत्यू लवकर झाला.

7/9
शर्माने तन्मय फुकनला दारूची व्यवस्था न करण्याची सूचना दिली होती, कारण तो एकटाच ती पुरवणार होता. आजारी पडण्यापूर्वी झुबीनसाठी जी दारू आणि महिलांची व्यवस्था केली होती, त्याबद्दलही शर्मा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

8/9
गोस्वामीने दावा केला आहे की, झुबीन हे एक उत्तम जलतरणपटू होते, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या पाण्यात बुडू शकत नाहीत. या जबाबात अमृतप्रभा महंता आणि निशिता गोस्वामी या दोन व्यक्तींची नावंही समोर आली आहेत. आता या धक्कादायक जबाबानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे.

9/9
कोर्टाने या गंभीर जबाबांची दखल घेऊन बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी आणि सह-गायिका अमृतप्रभा महंता यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि फुटेजच्या तपासणीतून आणखी कोणते सत्य बाहेर येते, याकडे आसामसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement