OTT Crime Thriller: 8 एपिसोडची क्राइम थ्रिलर सीरिज, ओटीटीवर केलाय कब्जा; गेल्या दोन महिन्यांपासून टॉप ट्रेंडिंग

Last Updated:
OTT Crime Thriller: ओटीटीवर आजकाल रोज नवे शो आणि चित्रपट रिलीज होत असतात. प्रेक्षकांनाही काय पाहावे हे ठरवणे कठीण जाते. पण जर एखादा शो सलग दोन महिने टॉप 10 मध्ये टिकतो, तर त्यात काहीतरी खास असते.
1/7
ओटीटीवर आजकाल रोज नवे शो आणि चित्रपट रिलीज होत असतात. प्रेक्षकांनाही काय पाहावे हे ठरवणे कठीण जाते. पण जर एखादा शो सलग दोन महिने टॉप 10 मध्ये टिकतो, तर त्यात काहीतरी खास असते. अशाच एका सीरिजविषयी जाणून घेऊया जी दोन महिन्यांपासून ट्रेंड करत आहे.

advertisement
2/7
ही सीरीज एक क्राइम थ्रिलर आहे. कथा एका काल्पनिक शहरात घडते, जिथे रहस्यमय खुनांची मालिका सुरू होते. तपासात हे खून एका पौराणिक प्राण्याशी जोडलेले असल्याचे समोर येते. त्यामुळे शोमध्ये रहस्य, अलौकिक भयपट आणि मानसशास्त्रीय थ्रिलर यांचा अनोखा मेळ पाहायला मिळतो.

3/7
 CIB अधिकारी रिया थॉमस (वाणी कपूर) आणि निलंबित पोलीस अधिकारी विक्रम सिंह (वैभव राज गुप्ता) या हत्याकांडाचा तपास करतात. तपासादरम्यान त्यांना कळते की या हत्यांचा संबंध 'आयस्त मंडल' नावाच्या एका शतकानूशतके जुन्या गुप्त संघटनेशी आणि बळीप्रथांशी जोडलेला आहे.

4/7
या क्राइम थ्रिलर सीरिजचं नाव आहे,'मंडला मर्डर्स'. 25 जुलै 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आणि अजूनही चार्टबस्टर ठरतेय. प्रदर्शित झाल्यापासून दोन महिन्यांहून अधिक काळ ही मालिका नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत आहे. यामुळे तिच्या लोकप्रियतेची प्रचंड झलक दिसते.

5/7
या शोमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला, वैभव राज गुप्ता आणि श्रिया पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्व कलाकारांनी केलेल्या अभिनयामुळे मालिकेचा प्रभाव अधिकच वाढतो. प्रेक्षकांना प्रत्येक भागानंतर पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता लागून राहते.

6/7
ही मालिका 'The Butcher of Benares' या कादंबरीवर आधारित आहे. YRF एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन गोपी पुथरन आणि मनन रावत यांनी केले आहे. शोमध्ये एकूण 8 भाग आहेत आणि प्रत्येक भाग साधारण 40 मिनिटांचा आहे.

7/7
जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आणि अनोख्या कथांचा शौक असेल, तर
जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आणि अनोख्या कथांचा शौक असेल, तर "मंडला मर्डर्स" नक्की पाहण्यासारखी आहे. ओटीटीवर याला भरभरुन प्रेम मिळत असून म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून ट्रेंडिग लिस्टमध्ये तग धरुन आहे.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement