मध्यभारतामध्ये 9 बालकांचा मृत्यू; आजाराचे गूढ कायमच, मेंदूज्वर प्रकरणाचा तपास सुरू

Last Updated:

नागपुरातील विविध रुग्णालयांत चौदा रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

News18
News18
नागपूर : मध्यभारतामध्ये मेंदूज्वरासारख्या संशयित आजारामुळे झालेल्या ९ बालकांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. नागपूर आणि छिंदवाडा परिसरात Acute Encephalitis Syndrome (AES) या आजारासारखे रुग्ण आढळून आले असून, मृत बालकांमध्ये महाराष्ट्रातील चार मुलांचा समावेश आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांचा वयोगट ० ते १६ वर्षे असा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (NIV) चमूने नागपूरात तपासणी केली असली तरी अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, नागपुरातील विविध रुग्णालयांत चौदा रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेंदूज्वराच्या मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले

advertisement
एनआयव्हीच्या पथकानेशहरातील मेडिकल, मेयो, एम्स या नावाजलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या रुग्णालयालाही भेट दिली. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तीव्र तापाच्या रुग्णांची माहिती घेत संशयित मेंदूज्वराच्या मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले. तसेच संशयित रुग्ण राहणाऱ्या मानकापूर परिसरातील डास व प्राण्यांचे नमुनेही गोळा केले गेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने या रुग्णांशी माध्यमांना भेटण्यास नकार दिला असून, तपासणी अहवाल आल्यानंतरच आजाराचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
advertisement

मेंदूज्वराची लक्षणे

मेंदूज्वर (अॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम) म्हणजे मेंदूला होणारी तीव्र जळजळ किंवा सूज आहे. ज्याची लक्षणे
अचानक तीव्र तापाने सुरू होतात. त्यात मानसिक अवस्थेत बदल (गोंधळ, चक्कर येणे), झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश असतो. काहीवेळा व्यक्तीला बोलता येत नाही किंवा चालताना अडचण येऊ शकते. विशेषतः १५ वर्षाखालील मुलांना या आजाराचा जास्त धोका संभवतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यभारतामध्ये 9 बालकांचा मृत्यू; आजाराचे गूढ कायमच, मेंदूज्वर प्रकरणाचा तपास सुरू
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement