Virat Rohit : 19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज, विराट-रोहित खेळणार का नाही? BCCI ने दिली सगळ्यात मोठी बातमी!

Last Updated:

आशिया कपमधल्या विजयानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. ही सीरिज संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज, विराट-रोहित खेळणार का नाही? BCCI ने दिली सगळ्यात मोठी बातमी!
19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज, विराट-रोहित खेळणार का नाही? BCCI ने दिली सगळ्यात मोठी बातमी!
मुंबई : आशिया कपमधल्या विजयानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. ही सीरिज संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळेल. 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी शनिवारी भारतीय टीमची घोषणा केली जाणार आहे, पण वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची टीम इंडियात निवड होणार का नाही? याबाबत कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न पडला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स बीसीसीआयने संपवला आहे. ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड होणार आहे, असं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. ऑस्ट्रेलियामधल्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी बीसीसीआय शनिवार 4 ऑक्टोबरला टीमची घोषणा करू शकते, असंही या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.
advertisement
मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाकडून खेळलेले नाहीत. या दोघांनीही 2024 साली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर यावर्षी इंग्लंड दौऱ्याच्या आधी दोघांनीही टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं, त्यामुळे आता 7 महिन्यांनी हे दोन्ही क्रिकेटपटू ब्लू जर्सीमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहेत.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

advertisement
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. 19 ऑक्टोबर (पर्थ), 23 ऑक्टोबर (ऍडलेड) आणि 25 ऑक्टोबर (सिडनी) ला 3 वनडे मॅच खेळवल्या जाणार आहेत. यानंतर दोन्ही टीममध्ये 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. बीसीसीआय वनडे टीमसोबतच टी-20 टीमचीही घोषणा करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Rohit : 19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिज, विराट-रोहित खेळणार का नाही? BCCI ने दिली सगळ्यात मोठी बातमी!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement