Badlapur : अत्याचाराची तक्रार नोंदवायला 12 तास लावले, पण 300 आंदोलकांवर एका रात्रीत गुन्हे
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
बदलापूरमध्ये अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास लावले. पण त्याच पोलिसांनी आंदोलकांवर मात्र एका रात्रीत गुन्हे दाखल केले.
मुंबई : बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर पुन्हा एकदा प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास लावले. तक्रार देण्यासाठी गेल्यावर 12 तासांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. यात पीडित कुटुंबियांना मदत करण्याऐवजी त्रासच दिला गेला. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर आणि आंदोलनानंतर गुन्हा दाखल करताना दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली गेली. मात्र याच पोलिसांनी आंदोलकांवर एका रात्रीत गुन्हा दाखल करून अटकही केली.
आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे एक्ट कायद्यांतर्गत ३०० जणांवर गुन्हा दाखल केला असून एकूण ६८ जणांना अटक करण्यात आलीय. यापैकी २८ जणांवर रेल्वे एक्ट कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलीय. रेल्वे रुळावर ठाण मांडून आंदोलकांनी १० तास आंदोलन केलं. यामुळे १० तास रेल्वे सेवा बंद होती. यावेळी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक केली गेली.
advertisement
मुलींच्या पालकांना जेव्हा त्यांच्या मुलींवर अत्याचार झाल्याचं समजलं तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली. तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा वैद्यकीय तपासणीनंतर बराच वेळ पोलीस चौकशी केली. या चौकशीनंतर १२ तासांनी रात्री पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. तोपर्यंत पीडित चिमुकल्या मुलींना आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं होतं. पीडितांच्या नातेवाईकांनी यावरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
प्रकरण कसं आलं लक्षात
आदर्श शाळा नावाच्या शाळेत शिकणाऱ्या ३ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार घडला. पीडित मुलींच्या पालकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी शाळेत तक्रार केली. तसंच पोलिसात धाव घेतली. पण शाळेकडून यावर कठोर पावले उचलली गेली नाहीत. पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केलाय. शाळेत अशा गोष्टी घडत असतील तर आपला पाल्य सुरक्षित कसा राहील असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.
advertisement
शाळा प्रशासन ते पोलीस, अनेकांवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, पालकांसह नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला असून शाळेच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शाळेत मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था का नव्हती? सीसीटीव्ही नव्हते का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
advertisement
- मुलींना शाळेत बाथरुमला जायला किंवा इतरत्र जायला महिली कर्मचारी का नव्हते?
- वारंवार शाळेत अशा घटना घडत आहेत त्यातून धडा घेवून शाळा प्रशाननाने याबाबत पावले उचलून महिला कर्मचारी का ठेवले नाहीत?
- शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती त्यानतंर पुन्हा तीच घटना घडते यांवरुन स्पष्ट होते की शाळेने प्रकरण गंभीरतेने घेतले नव्हते
- पोलिसांनी पिडीत मुलीच्या पालकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप नागरीक करत आहेत? त्यामुळे पोलिस अशा प्रकरणात गंभीर नव्हते का?
- पोलिसांनी प्रकरण हाताळता आले नाही
- बदलापूर बंदचे सोशल मिडिया कॅम्पेन सुरु असताना पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही?
- कोर्टाच्या गाईडलाईन नुसार शाळा आणि पोलिसांनी सुरुवाती पासून कारवाई का केली नाही?
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Badlapur : अत्याचाराची तक्रार नोंदवायला 12 तास लावले, पण 300 आंदोलकांवर एका रात्रीत गुन्हे


