advertisement

Badlapur : पीडितेची आई गर्भवती, तिलाही 10 तास पोलीस स्टेशनला बसवलं; धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

दोन पीडित मुलींपैकी एकीची आई गर्भवती असून तिलाही १० तास पोलीस स्टेशन आणि रुग्णालयात बसवून ठेवण्यात आलं.

News18
News18
मुंबई : बदलापूरमध्ये अवघ्या साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना घडलीय. ज्याला मुली दादा म्हणायच्या त्यानेच असा प्रकार केल्यानं खळबळ उडाली आहे. शाळेतही आता मुली सुरक्षित नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि बदलापूर स्टेशनवर रेलरोको करण्यात आला. तब्बल १० तास रेल्वे रुळावर आंदोलक ठाण मांडून होते. दरम्यान, मुलींवर अत्याचार प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप आहे. दोन पीडित मुलींपैकी एकीची आई गर्भवती असून तिलाही १० तास पोलीस स्टेशन आणि रुग्णालयात बसवून ठेवण्यात आलं. अनेक तास तक्रार दाखल करून घेतली गेली नाही.
पीडित मुलीची आई गर्भवती असताना पोलिसांकडून १० तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं गेलं. यामुळे पीडितेच्या आईला मोठा धक्का बसला. यामुळे तब्येत बिघडली आणि तापही आला. पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलं की, आम्ही एका खासगी रुग्णालयात मुलीची तपासणी केली तेव्हा लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं. त्यानंतर सरकारी रुग्णालयात पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बराच वेळ पोलीस स्टेशनला चौकशी केली.
advertisement
वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस चौकशीत बराच वेळ गेला. हा काळ पीडित मुलगी आणि तिच्या आईसाठी खूपच त्रासदायक होता असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय. पोलिसांनी या प्रकरणात संवेदनशिलता दाखवली नाही. लहान मुलीचं प्रकऱण असूनही गुन्हा दाखल करायला वेळ लावला असं नातेवाईकांनी म्हटलंय.
advertisement
चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण गंभीर असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ का लावला? असा सवाल आंदोलकांनी विचारला. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर नुसार १६ ऑगस्टला याची माहिती देण्यात आली. एका मुलीच्या पालकांना समजलं की, दुसरी एक मुलगी शाळेत जायला घाबरत आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होत असल्याची तक्रार करत आहे. शाळेत कुणीतरी तिच्यावर अत्याचार केल्याच्या संशयानंतर रुग्णालयात नेलं गेलं. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Badlapur : पीडितेची आई गर्भवती, तिलाही 10 तास पोलीस स्टेशनला बसवलं; धक्कादायक माहिती समोर
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement