कल्याणकरांच्या काळा तलावाचं रूप पालटणार, घाणीच्या साम्राज्यातून होणार सुटका

Last Updated:

Kalyan Kalatalav News: काळा तलाव कल्याणमध्ये एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे कल्याण पश्चिम येथे आहे.हा तलाव परिसर पून्हा एकदा नव्या रूपात खुलणार आहे.

Kala talav in kalyan 
Kala talav in kalyan 
काळा तलाव कल्याणमध्ये एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे कल्याण पश्चिम येथे आहे.हा तलाव परिसर पुन्हा एकदा नव्या रूपात खुलणार आहे. कोणतीही जागा कमी न करता नागरिकांना जास्त सुविधा देऊन पुढील दोन महिन्यांत कल्याण डोंबिवली तसेच आसपासच्या नागरिकांसाठी येथे उपलब्ध होणार आहेत.
केडीएमसी प्रशासनाने तलाव परिसरातील बोटिंग, फिशिंग, तरंगता पुल, बंद असलेला लेझर शो आणि फाउंटन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.' स्वच्छ हवेसाठी काळा तलावावर यायचे अन् खरकटे अन्न पाहायचे का? या शीर्षकाखाली 14 ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तलाव परिसरात होणाऱ्या सोयी सुविधांबाबत माध्यमांना माहिती दिली असता. आता नागरिकांना अधिक चांगल्या सोयींसह स्वच्छ व आकर्षक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. बोटिंग, फिशिंग, तरंगता पूल लवकरच बंद असलेला लेझर शो पुन्हा सुरु करण्यात येणार परिसरातील काम पूर्ण झाल्यानंतर तलाव परिसर सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
advertisement
फूड स्टॉल्स उभारताना कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण होणार नाही तसेच झाडांची तोडही करण्यात आलेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. जॉगिंग ट्रॅक, व्यायाम आणि मुलांच्या खेळण्याच्या जागांमध्ये कोणताही बदल होणार नाही.प्रबोधनकार ठाक सरोवर परिसरात केवळ सुशोभीकर केले जात असून, कोणतीही जागा कमी न करता नागरिकांना जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन महिन्यात नागरिकांना नव्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. तलावात विहार करण्यासाठी नवीन हायटेक बोटी आणण्यात आल्या आहेत. परिसरात नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. हे करत असताना ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.त्यामुळे सर्वसामान्यांपासून जेष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
कल्याणकरांच्या काळा तलावाचं रूप पालटणार, घाणीच्या साम्राज्यातून होणार सुटका
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement