सुट्टी मागणं ठरलं गुन्हा! कर्मचाऱ्याला मॅनेजरनं दिलं असं उत्तर, ऐकून तुम्ही म्हणाल, "असं कोण करतं?"

Last Updated:

‘What should I do with this kind of Manager?’ या नावाने पोस्ट करण्यात आलेल्या घटनेने भारतीय ऑफिस कल्चरमधील “टॉक्सिक मॅनेजमेंट” या विषयाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतातील कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांवर होणारा मानसिक आणि भावनिक ताण दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कामाच्या ठिकाणी ‘डेडलाईन’, ‘टार्गेट’ आणि ‘परफॉर्मन्स’ यांच्या दबावात अनेक कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. पण त्याहूनही वेदनादायक गोष्ट म्हणजे आजारपण किंवा अडचण सांगितल्यावरही काही मॅनेजरकडून थंड, असंवेदनशील वागणूक मिळते. ज्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना आपण आजारी पडलो म्हणजे आपणच काही चूक केली असं वाटतं.
अलीकडेच अशाच एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा पेटवली आहे. Reddit वर ‘What should I do with this kind of Manager?’ या नावाने पोस्ट करण्यात आलेल्या घटनेने भारतीय ऑफिस कल्चरमधील “टॉक्सिक मॅनेजमेंट” या विषयाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
एका आजारी कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या ब्रांच मॅनेजरचा झालेला संवाद अनेकांना हादरवून सोडणारा आहे. या घटनेने दाखवून दिलं की, आजच्या कॉर्पोरेट संस्कृतीत “मानवी मूल्यं” आणि “समजूतदारपणा” किती वेगाने कमी होत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय होतं?
त्या कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला कळवलं की त्याला गंभीर आरोग्य समस्या असल्याने (बहुधा पाइल्स किंवा फिशर) तो ऑफिसला येऊ शकत नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याने त्याचे मेडिकल सर्टिफिकेट आणि प्रिस्क्रिप्शनही मॅनेजरकडे शेअर केलं.
त्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं की, “मी बसू किंवा उभा राहू शकत नाही, कृपया आज मला मेडिकल लीव्ह द्या.” मात्र काही उत्तर न आल्याने त्याने पुन्हा लिहिलं की “स्थिती अजूनही हाताबाहेर आहे.”
advertisement
पण मदत किंवा सहानुभूती मिळण्याऐवजी, त्यालाच शिस्त शिकवण्यात आली मॅनेजर म्हणाला, "कोणी तुला शिस्त शिकवली? आता सुट्टी मागतोयस? दोन्ही दिवसांचं वेतन तुझं कापलं जाईल."
कर्मचाऱ्याने पुन्हा नम्रपणे सांगितलं, “सर, माझी तब्येत खूप खराब आहे, मी डॉक्टरांकडे गेलो आहे. कृपया माझी परिस्थिती समजून घ्या.”
तरीही मॅनेजरचा सूर अधिक कठोर झाला, “तुझं काम कोण करणार? जबाबदारीपासून पळ काढलास तर समस्या वाढतील. तू पहिल्या 10 दिवसांचा कमिटमेंटही पाळला नाहीस,” असं तो म्हणाला.
advertisement
कर्मचाऱ्याने शांतपणे उत्तर दिलं, "सर, मी फक्त बरा होण्यासाठी थोडा वेळ मागतोय. मी माझं काम परत येऊन पूर्ण करेन."
ऑनलाइन लोकांचा संताप
ही संपूर्ण चॅट Reddit वर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी मॅनेजरच्या वागणुकीवर ताशेरे ओढले. काहींनी लिहिलं. “मॅनेजरला आधी इंग्रजी आणि मग मानवता शिकवण्याची गरज आहे.” तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलं होतं की “अशा लोकांसोबत काम करणं म्हणजे मानसिक छळच.”
advertisement
अनेकांनी कर्मचाऱ्याला सल्ला दिला की तो HR विभागाला सर्व पुरावे पाठवावा आणि शक्य तितक्या लवकर चांगल्या संधीसाठी नवीन नोकरी शोधावी. काहींनी स्पष्ट लिहिलं, “तुझं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. तू गुलाम नाहीस, कर्मचारी आहेस. सर्व पुरावे जतन करून ठेव आणि गरज पडल्यास कायदेशीर कारवाई कर.”
ही घटना काय दाखवते?
अशी अनेक उदाहरणं आज भारतीय कंपन्यांमध्ये दिसत आहेत, जिथे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, मानसिक तणाव आणि थकव्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ‘प्रॉडक्टिव्हिटी’ आणि ‘कमिटमेंट’च्या नावाखाली संवेदनशीलतेचा अभाव वाढताना दिसतो आहे आणि हीच बाब आजच्या कॉर्पोरेट संस्कृतीसाठी मोठा इशारा ठरते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सुट्टी मागणं ठरलं गुन्हा! कर्मचाऱ्याला मॅनेजरनं दिलं असं उत्तर, ऐकून तुम्ही म्हणाल, "असं कोण करतं?"
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement