Kalyan News : कल्याण ते अंबरनाथ प्रवास होणार सुपरफास्ट! महापालिकेने दिले मोठे आदेश
Last Updated:
kalyan Ambernath Road : कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम तीन वर्षांनी पुन्हा सुरू होणार आहे. पावसाळ्यामुळे थांबलेला प्रकल्प आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू होईल.
उल्हासनगर : कल्याण अंबरनाथ मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवातीचा मुहूर्त मिळाला आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम ठप्प पडले होते. पण आता राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
'या' दिवशी होणार सुरुवात
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी आमदार कुमार आयलानी यांना बैठकीत सांगितले की, रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होईल. राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी तीन टप्प्यात 68 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून काम रखडलेले असल्यामुळे प्रशांत मानकर यांच्या कारभारावर काही प्रमाणात टीका होत आहे.
advertisement
शहरात सुरू असलेल्या 450 कोटींच्या निधीतील भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यानंतरच कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम सुरू होणार आहे, असे मानकर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी त्यांनी काम सुरू केले होते,पण पावसाळा सुरू होताच ते थांबले.
आमदार आयलानी यांनी सोमवारी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका बांधकाम विभागाची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर अधिकाऱ्यांना कठोर प्रश्न विचारले गेले. खास करून कल्याण-बदलापूर रस्त्यातील खड्ड्यांमुळे ट्रक आणि टेम्पोच्या चाके फसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
advertisement
बैठकीत प्रशांत मानकर यांनी आश्वासन दिले की, पुढील आठवड्यात रस्त्याचे काम सुरू होईल. तसेच 20 कोटींच्या नागरी सुविधेतील तब्बल 200 कामांना देखील मुहूर्त मिळेल. महापालिकेचे शहर अभियंता निलेश शिरसाठे रस्त्याच्या समस्यांबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना आमदार आयलानी यांनी तग धरले. त्यांच्या मदतीस कार्यकारी अभियंता संदीप जाधव धावले आणि रस्त्याचे काम आणि त्यासंबंधी समस्या आयलानी यांना समजावून सांगितल्या.
advertisement
एकूणच, दिवाळीपर्यंत शहरातील रस्त्यांची कामे सुरळीत होण्याची शक्यता आहे. आमदार आयलानी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना अनेक वर्षांपासून असलेली अडचण दूर होणार आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : कल्याण ते अंबरनाथ प्रवास होणार सुपरफास्ट! महापालिकेने दिले मोठे आदेश