Crime: अंधारात रस्स्यावर एकट्या तरूणीला त्याने गाठलं, आधी छेड आणि मग केलं असं काही

Last Updated:

मिरा-भाईंदरमध्ये एका नराधमाने रस्त्यावरून जाणाऱ्या असहाय्य तरूणीची छेड काढली, पुढे तिच्यावर ब्लेडने वार केले...

News18
News18
राजा मायळ, प्रतिनिधी
ठाणे: राज्यातील तरूणींवरील अत्याचार आणि हल्ल्याच्या घटना काही केल्या  थांबतना दिसत नाहीत. यशश्री शिंदेच्या खूनाची घटना ताजी असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने तरूणीचे छेड काढली तीने विरोध केल्यानंतर तरूणीवरच हल्ला चढवला.
नेमकं काय घडलं?
साधारण एका आठवड्यापूर्वी एक तरूणी आपलं काम संपवून रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावरून घराकडे जात होती. अंधाराचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत भररस्त्यात तिची छेड काढली . संबंधित तरूणाने आरोपीला मोठा विरोध केला, त्यानंतर तरुणीने स्वतःच्या बचावाकरिता विरोध केल्याने तिला मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने थेट तिच्यावर ब्लेडने वार केले. विनयभंग करून तरूणीस जखमी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. तरुणीवर हल्ला करणाऱ्या 33 वर्षीय इसमाला पोलिसांनी सोमवारी बोरिवली वेस्ट परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर नवघर पोलीस ठाण्यात कलम 74,75 76,78,118(1),115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत २५ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार समांतर तपास गुन्हे शाखा 1 यांच्या मार्फत करण्यात येत होता. घटना स्थळहुन मिळालेले सीसीटीव्ही व गुप्त बातमीदार यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार सदर इसम बोरिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला घटनास्थळी जात दीपक माळी (व्यवसाय गायकी ) याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहरातील महिलांकडून सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
advertisement
महिलांवरील हल्ले अत्याचार थांबणार कधी? 
राज्यात महिला आणि तरूणींवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. याला नेमका आळा बसणार कधी? अशा गुन्हेगारांना पायबंद घालणार कोण? असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Crime: अंधारात रस्स्यावर एकट्या तरूणीला त्याने गाठलं, आधी छेड आणि मग केलं असं काही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement