Ambernath Election : निवडणुकीपूर्वी महा-चूक! उल्हासनगरमधील हजारो मतदारांची नावे अंबरनाथ पालिकेच्या यादीत; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Ambernath Election : अंबरनाथ महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मोठी चूक समोर आली आहे. उल्हासनगरमधील हजारो मतदारांची नावे अंबरनाथ पालिकेच्या मतदार यादीत आढळल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक 28 मध्ये जी मतदार यादी समाविष्ट करण्यात आली होती त्याबाबत राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी हरकती घेतल्या. मात्र हरकतीची मुदत 17 ऑक्टोबर रोजी संपल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 28 मध्ये काही मतदार याद्या परस्पर समाविष्ट निदर्शनास येत आहे.
यादी क्रमांक 342, 325 आणि 326 या यादीमध्ये उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील मतदारांची नावे असताना त्यातील अनेक नावे ही अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले.अंबरनाथमधील राजकीय पक्षांना प्रारूप मतदार यादींवरच हरकती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र प्रभाग क्रमांक 28 मध्ये नव्याने जी यादी समाविष्ट केली त्याची कोणतीही माहिती दिली नाही.त्यामुळे उल्हासनगरमधील हजारो मतदार थेट अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावण्याची शक्यता आहे.
advertisement
यासंदर्भात पालिकेचे अधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये उल्हासनगर शहराशी संबंधित असलेल्या यादीचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिकेने परस्पर उल्हासनगरशी संबंधित तीन मतदार यादीतील नावे थेट अंबरनाथच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरच्या मतदारांना अंबरनाथमध्ये मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी तयार करताना प्रभाग क्रमांक 28 मध्ये ज्या याद्यांचा समावेश नव्हता त्या याद्या हरकतींची मुदत संपल्यानंतर समाविष्ट केल्यामुळे त्या समाविष्ट याद्यांची माहिती इच्छुक उमेदवारांना आणि पक्षांपर्यंत गेलीच नाही.
advertisement
अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या हद्दीवरून वाद प्रभाग क्रमांक 28 हा उल्हासनगर शहराला लागून असल्यामुळे विधानसभेतील काही याद्या या अंबरनाथ आणि उल्हासनगरला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादी तयार करताना अधिकाऱ्यांनी प्रचंड घोळ केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Ambernath Election : निवडणुकीपूर्वी महा-चूक! उल्हासनगरमधील हजारो मतदारांची नावे अंबरनाथ पालिकेच्या यादीत; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह


