Navi Mumbai: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद

Last Updated:

Navi Mumbai Water Cut: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईतील रहिवाशांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. 9 जुलैपासून खारघरसह काही भागात पुरवठा बंद राहील.

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्याच पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्याच पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागेल. हेटवणे धरणाच्या जलवाहिनीवरील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सिडको महामंडळाकडून खारपाडा पूल परिसरात आपत्कालीन दुरुस्ती काम सुरू आहे. त्यामुळे खारघरसह काही भागातील पाणीपुरवठा 9 जुलैपासून 48 तासांसाठी बंद राहणार आहे. याबाबत सिडकोने माहिती दिली असून पुढील काही काळ पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
सिडकोकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे बुधवार, दि. 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवारी, 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात द्रोणागिरी, उलवे, खारघर व तळोजा नोडमध्ये पाणी बंद राहील. तर 11 जुलैपासून काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.
advertisement
दरम्यान, उन्हाळ्यात देखील तळोजा, खारघर या भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी विकत घ्यावे लागले होते. आता जलवाहिनीला मोठी गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Navi Mumbai: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement