Bhiwandi : शाळेची फी भरली नाही, शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत असं काही केलं, भिवंडीतील त्या प्रकाराने संताप

Last Updated:

Bhiwandi News : भिवंडीतील स्कूलमध्ये फी न भरल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी जमिनीवर बसवले. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

News18
News18
भिवंडी : भिवंडी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना उघडकीस आली आहे, ज्याने मानवतेला आणि शाळेच्या प्रतिष्ठेला मोठा कलंक लावला आहे. शहरातील एका शाळेतील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला फक्त 1,300 रुपये फी शिल्लक असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या आणि अपमानकारक वागणुकीला सामोरे जावे लागले. शाळेने त्याला सहामाही परीक्षेत चटईवर बसवून पेपर द्यायला लावले.
नेमके घडले तरी काय?
घडले असे की, भिवंडी शहरात राहत असलेल्या एका विद्यार्थ्याला इतर मित्रांबरोबर बसण्याची परवानगी न देता, त्याला जमिनीवर बसवून परीक्षा देण्यास भाग पाडले. ही घटना विद्यार्थ्यांने घरी सांगितली, तेव्हा पालकांनी लगेच शाळेत जाऊन प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, शाळेकडून केवळ फी शिल्लक आहे म्हणून शिक्षा देण्यात आली असे उत्तर मिळाले, जे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्याच्या अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
advertisement
विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शाळेतील अमानुष वागणुकीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या संरक्षण कायद्याच्या कलम 75 आणि 87 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पालक, नागरिक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी शाळा प्रशासनाच्या या प्रकारच्या अमानुष आणि अपमानजनक वागणुकीवर तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी या घटनेला शैक्षणिक संस्थांतील नैतिकतेवर आणि मुलांच्या हक्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी मानले आहे.
advertisement
विशेष म्हणजे ही घटना केवळ एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, तर सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी धक्कादायक इशारा ठरली आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी, आत्मसन्मान आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शाळा प्रशासनाने तत्काळ जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अशा प्रकारच्या अमानुष वागण्यावर कारवाई केली पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi : शाळेची फी भरली नाही, शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत असं काही केलं, भिवंडीतील त्या प्रकाराने संताप
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement