Thane Traffic: मोठी बातमी! ठाण्यातील घोडबंदर रोड 4 दिवस बंद, या वाहनांना ‘नो एन्ट्री’, पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ghodbunder Road: ठाण्यातील घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यां वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घोडबंदर रोड 4 दिवस वाहतुकीसाठी बंद राहील.
ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुखदरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 11 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजेपासून 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
घोडबंदरवरील काजूपाड्यापासून चढण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेने त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू केले होते. रस्ता खोदून त्याचे मजबुतीकरण केले. मात्र, पावसाने उघडीप न दिल्याने पुढील काम राहिले होते. आता पुन्हा रस्त्याची दुरवस्था होऊन चढणीवर वाहतूक मंदगतीने होऊन मोठी कोंडी होत होती. शिवाय या ठिकाणी अपघात होत होते.
advertisement
पावसाने उघडीप दिल्याने आता मीरा – भाईंदर महापालिकेने या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम पुन्हा हाती घेतले आहे. त्यासाठी ठाण्याकडे जाणारी मार्गिका बंद केली जाणार आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे उपायुक्त (मुख्यालय) अशोक वीरकर यांनी जड वाहनांना वाहतूक बंदीची अधिसूचना जारी केली आहे.
advertisement
हे मार्ग राहणार बंद
गुजरात, पालघर, वसई-विरारकडून येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी असेल. तसेच मुंबई, मीरा-भाईंदरकडून वरसावे नाका येथून घोडबंदरमार्गे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना देखील प्रवेश बंद केला आहे. तर ठाण्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांनादेखील कापूरबावडी येथेच बंदी आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
view commentsगुजरात, पालघर, विरारकडून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथून पारोळ-अंबाडी मार्गाने वळवण्यात आले आहे. यात वसईकडून महामार्गावर येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी, कामण, भिवंडीमार्गे वळवले आहे. मुंबई, मीरा-भाईंदरकडून वरसावे नाका येथून घोडबंदरमार्गे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. ही वाहने चिंचोटी - कामणमार्गे, शिरसाट फाटामार्गे घेऊन जावी लागतील.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 11, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Traffic: मोठी बातमी! ठाण्यातील घोडबंदर रोड 4 दिवस बंद, या वाहनांना ‘नो एन्ट्री’, पर्यायी मार्ग