यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ला मीट युअर मॅच, मुक्या जीवांवर करा भरभरून प्रेम, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
Valentines Day प्रियजनांमध्ये प्राण्यांचाही समावेश असू शकतो हे सांगणारी एक वेडींग थीम फ्रीडम फार्म संस्थेनं राबवली आहे.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रियजनांसाठी आपण अनेक प्लॅनही बनवतो. पण याच प्रियजनांमध्ये प्राण्यांचाही समावेश असू शकतो हे सांगणारी एक वेडींग थीम ठाण्यातील फ्रीडम फार्म संस्थेनं राबवली आहे. या थीमचं नाव 'मीट युअर मॅच' असं आहे. या थीमनुसार उपचारातून बरे झालेले प्राणी किंवा रस्त्यावरून रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना दत्तक दिलं जातं. त्यांनाही यानिमित्तानं एक चांगलं कुटुंब मिळावं यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे, असं संस्थेचे अध्यक्ष प्रणव त्रिवेदी सांगतात. दरम्यानं या माध्यमातून अनेक कुटुंबांनी प्राण्यांना दत्तक घेतलं आहे.
advertisement
मुक्या जीवांना मिळतंय कुटुंब
फ्रीडम फार्म फाउंडेशनच्या माध्यामातून विविध प्राण्यांना रेस्क्यू करून आणलं जातं. त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यांचा सांभाळ केला जातो. तसेच या प्राण्यांना सांभाळणारं कोणी चांगलं कुटूंब भेटेल याची व्यवस्थाही केली जाते. एवढचं नाही तर एखाद्या प्राण्याला दत्तक देण्यावेळी त्या कुटूंबाची चौकशी करूनच योग्य तो निर्णय घेतला जातो. अनेक वर्षांपासून ही फांउडेशन प्राणीसेवा करतेय. तसेच वेगवेगळ्या थीममधून मुक्या जीवांनाही आपल्याप्रमाणेच वागवलं पाहिजे, त्यांनाही भावना असतात हे वेळोवेळी दाखवून आणि समजावून सांगितलं आहे. आतापर्यंत जवळपास हजारोंच्या घरात या फाउंडेशननं प्राण्यांचा जीव वाचवला आणि त्यातील काहींना चांगल्या ठिकाणी दत्तकही दिलं आहे.
advertisement
कुठून येतात प्राणी?
या फाउंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर सोडून दिलेले कुत्रे- मांजर, कोणत्याही अपघातानं जखमी झालेले प्राणी, रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडलेले प्राणी अशा अनेक प्रसंगांमध्ये सापडलेल्या प्राण्यांना रेस्क्यू केलं जातं. तसेच काहीजण या फाउंडेशनच्या सदस्यांसोबत संपर्क साधून प्राण्यांना आणूनही सोडतात. या प्राण्यांचा सर्व खर्च, त्यांच्या राहण्याची व्यवस्था सगळं काही या फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान एखाद्या प्राण्याला दत्तक देतानाही बरीच काळजी घेतली जाते.
advertisement
प्राण्यांना दत्तक घेण्याची प्रक्रिया
"आम्ही एखाद्या प्राण्याला दत्तक देण्यावेळी त्या कुटूंबाची चौकशी करतो. त्यांच्या घरचं वातावरण प्राण्यांना मानवेल असं आहे का? हे पाहतो. तसेच एखाद्या प्राण्याला घेऊन गेल्यावर दोन आठवड्यांचा वेळ दिला जातो. जेणेकरून आम्हाला हे समजतं की तो प्राणी त्या कुटूंबासोबत राहू शकतो की नाही. मगच त्या प्राण्याला आम्ही कुटूंबाकडे कायमच सोपवतो. तसेच त्या प्राण्याबद्दलची सर्व माहितीही त्या कुटूंबाला देतो. तसेच वेळोवेळी त्यांची चौकशीही करतो." असं फ्रीडम फार्म फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव त्रिवेदी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अनेकांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून तेथील प्राण्यांना दत्तकही घेतलं आहे. तसेच या प्राण्यांच्या खर्चासाठी फाउंडेशनला मदत मिळावी अशी अपेक्षाही प्रणव यांनी बोलून दाखवली.
advertisement
मुक्या प्राण्यांना आपण थोडा जरी जीव लावला तरी त्यापेक्षा भरभरून ते आपल्याला प्रेम देतात. त्यांना गरज असते ती फक्त कोणीतरी मनापासून स्वीकारण्याची आणि प्रेम करणाऱ्या हक्काच्या कुटुंबाची. त्यामुळे या मुक्या प्राण्यांनाही कुटूंब हवं असतं, आपली माणसं हवी असतात. त्यांची अपेक्षा फक्त आपल्याकडून प्रेमाची असते हे या फाउंडेशनकडून नक्कीच शिकायला मिळतं.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
February 13, 2024 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ला मीट युअर मॅच, मुक्या जीवांवर करा भरभरून प्रेम, Video

