Valentines Day हेल्दी सेलिब्रेट करायचाय? बाजारात आलीये 'शुगर फ्री' चॉकलेट, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आता विविध ड्रायफ्रुट्स असणाऱ्या या शुगर फ्री चॉकलेट्ससह आरोग्यदायी व्हॅलेंटाईन डे साजरा करता येणार आहे.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: 'व्हॅलेंटाइन डे'साठी सगळेचजण आपल्या प्रियजनांना खास गिफ्ट देत असतात. यात अनेकजण चॉकलेट्सही देत असतात. पण अलिकडे आरोग्याच्या समस्यांमुळे काहीजण चॉकलेट्स खाणं टाळतात. अशांसाठी आता शुगर फ्री चॉकलेट्स बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे आता विविध ड्रायफ्रुट्स असणाऱ्या या शुगर फ्री चॉकलेट्ससह आरोग्यदायी व्हॅलेंटाईन डे साजरा करता येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ डॉ. दादाभाई नौरोजी रोडवर एक ड्रायफ्रुट्सचे दुकान असून या ठिकाणी आपल्याला या शुगर फ्री चॉकलेट्सच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत.
advertisement
शुगर फ्री चॉकलेट्सची निर्मिती
चॉकलेट्स खायला सर्वांनाच आवडते पण मधुमेहासारख्या आजारांमुळे ते सर्वांनाच खाणं शक्य होत नाही. यासाठी मुंबईतील कलत्रा ड्रायफ्रुट्स यांनी शुगर फ्री चॉकलेट्स तयार केलंय. या चॉकलेट्सच्या अनेक व्हरायटी त्यांनी तयार केल्या आहेत. तसेच खास गिफ्ट हँपरही बनवले आहेत. आता व्हॅलेंटाईन डे साठी येथील चॉकलेट्सना चांगली पसंती मिळत असून परवडणाऱ्या किमतीतील शुगर फ्री चॉकलेट्स घेण्यासाठी अनेकजण दुकानाला भेट देत असतात.
advertisement
चॉकलेटचे प्रकार आणि किंमत?
शुगर फ्री चॉकलेटमध्ये वेगवेगळ्या फळांचे आणि दुधाचे फ्लेवर असणारे प्रकार पाहायला मिळतात. तर काही चॉकलेट्समध्ये मिंट फ्लेवरही पाहायला मिळतो. या चॉकलेट हबमध्ये तुम्हाला किलोवर चॉकलेटस मिळतील. शुगर फ्री ड्रायफ्रुटस असलेले चॉकलेट्स 1 किलो घेतले तर त्यांची किंमत 1 हजार रुपयांपासून सुरु होते. तर पुढे जसा फ्लेवरमध्ये बदल होईल तशी ती किंमत बदलत जाते. या ठिकाणी इम्पोर्टेंट चॉकलेटस् आणि गिफ्ट हँपर 250 रुपयांपासून उपलब्ध आहे.
advertisement
गुलाबाच्या फुलांसहित 5 ते 6 चॉकलेट्सचं गिफ्ट हॅंपर घ्यायचं असेल तर त्याची किंमत केवळ 150 रुपयांपासून सुरू होते. एवढचं नाही तर त्यांनी व्हॅलेंटाईनसाठी फक्त ड्राय फ्रुटसच्या ट्रेचंही गिफ्ट हॅंपर तयार केलं आहे. ज्यात 6 ते 7 प्रकारचे ड्राय फ्रुट्स मिळतील.
दरम्यान, आपला व्हॅलेंटाईन डे स्पेशल आणि आरोग्यदायी साजरा करायचा असेल तर शुगर फ्री ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. सध्याच्या काळात डायेटमुळे अनेकजण जास्त गोड-धोड खाणं टाळतात. अशा लोकांसाठी शुगर फ्री चॉकलेट्स नक्कीच चांगला पर्याय आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 12, 2024 2:08 PM IST

