Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, या दिवशी पाणीपुरवठा 24 तास राहणार बंद
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीच्या देखभालीसाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात येत आहे.
ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीच्या देखभालीसाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी गुरुवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत बारवी गुरुत्व वाहिनी क्र. 1, 2 व 3 वर दुरुस्तीचे आणि उन्नतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत MIDC कडून पाणीपुरवठा होणाऱ्या विविध भागांमध्ये 24 तास पाणी उपलब्ध होणार नाही.
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत
दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता), कळवा प्रभाग समितीमधील सर्व क्षेत्रे तसेच वागळे प्रभाग समिती अंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभागातील कोलशेत खालचा गाव.
advertisement
पाणीपुरवठा बंदी संपल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत पाण्याचा साठा करून ठेवावा आणि आवश्यक असल्यास पाणी अत्यंत काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 07, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, या दिवशी पाणीपुरवठा 24 तास राहणार बंद