आईच्या कुशीत मुलगा-मायलेकरांना जलसमाधी, भातसा नदीत तिघे बुडाले, नेमकं काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Three death Bhatsa River Shahapur: भातसा नदीत मायलेकरांसह एकूण तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी तिघेही नदीवर गेले होते.
शहापूर, पालघर : भातसा नदीत कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२९ मार्च) सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे शहापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
वनिता सुदर्शन शेळके (वय ३३, रा. वाफे), लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५०, रा. चेरपोली), धीरज दत्तात्रय पाटील (वय १५, रा. चेरपोली) अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. तिघेही सकाळी भातसा नदीवर गेले होते.
या दुर्घटनेत लक्ष्मी पाटील आणि धीरज पाटील या मायलेकरांना जलसमाधी मिळाली. तिघेही सकाळी कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी नदीकाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले, अशी प्राथमिक माहिती आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक पथकाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवत तिन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
April 09, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईच्या कुशीत मुलगा-मायलेकरांना जलसमाधी, भातसा नदीत तिघे बुडाले, नेमकं काय घडलं?









