पर्यटकांनो, लक्ष द्या! आता माथेरान, दार्जिलिंगची मजा कोयनेत, सह्याद्रीच्या कुशीत धावणार 'जॉय मिनी ट्रेन'
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Patan (Satara) : माथेरान, दार्जिलिंग आणि सिमला येथील प्रसिद्ध हिल रेल्वेप्रमाणे आता सह्याद्रीच्या हृदयात, कोयनानगरच्या निसर्गरम्य परिसरात एक नवी स्वप्नवत सफर...
Patan (Satara) : माथेरान, दार्जिलिंग आणि सिमला येथील प्रसिद्ध हिल रेल्वेप्रमाणे आता सह्याद्रीच्या हृदयात, कोयनानगरच्या निसर्गरम्य परिसरात एक नवी स्वप्नवत सफर आकाराला येत आहे. अनेक वर्षांपासून थांबलेली पर्यटनाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या संकल्पनेतून कोयनेच्या जलाशयाजवळ 'जॉय मिनी ट्रेन' लवकरच धावणार आहे.
मिनी ट्रेन एक अविस्मरणीय अनुभव
असा असेल जादुई प्रवास कोयनानगरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मिनी ट्रेन एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. मॉडेल रूमपासून सुरू होऊन नेहरू उद्यानापर्यंतचा हा प्रवास प्रवाशांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. डोंगरदऱ्यांमधून नागमोडी वळणे घेत, ढगांना स्पर्श करत, धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या काठाने आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत हा प्रवास पूर्ण होईल. प्रत्येक वळणावर निसर्ग जणू काहीतरी नवीन दाखवत असल्याचा अनुभव येईल, जो केवळ एक प्रवास नसून एक भावनिक सफर ठरेल.
advertisement
स्थानिकांना रोजगाराची नवी संधी
स्थानिकांना रोजगाराची नवी संधी हा प्रकल्प केवळ पर्यटकांसाठीच नाही, तर स्थानिकांसाठीही विकासाचे नवे दरवाजे उघडणार आहे. मिनी ट्रेनमुळे वाढणाऱ्या पर्यटनातून 'होम स्टे', स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला विक्री आणि स्थानिक गाईड सेवा अशा अनेक व्यवसायांना चालना मिळेल, ज्यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव, आवश्यक परवानग्या आणि आर्थिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोयनानगर देशाच्या आणि जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे स्थळ म्हणून उदयास येईल.
advertisement
हे ही वाचा : कष्टाची कमाई क्षणात गेली, ना परतावा मिळाला, ना मुद्दल; सांगलीत 'शेअर मार्केट'च्या नादात महिलेची मोठी फसवणूक
हे ही वाचा : Kolhapur Navratri 2025: नवरात्रौत्सवासाठी करवीरनगरीत लगबग, वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पर्यटकांनो, लक्ष द्या! आता माथेरान, दार्जिलिंगची मजा कोयनेत, सह्याद्रीच्या कुशीत धावणार 'जॉय मिनी ट्रेन'