मुंबईतल्या सभेदिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कट्टर साथीदारच शिंदेसेनेत प्रवेश करणार!

Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी मुलीला तिकीट न दिल्याने माजी आमदार दगडू सकपाळ हे नाराज होते.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे
राज ठाकरे-उद्धव ठाकरे
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेची मोठी चर्चा सुरू असताना आणि महाराष्ट्रालाही उत्सुकता लागून राहिलेल्या सभेआधीच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या सभेदिवशीच सपकाळ शिंदेंसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळमध्ये सपकाळ यांची मोठी ताकद आहे.
दगडू सकपाळ हे मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुलीला तिकीट न दिल्याने माजी आमदार दगडू सकपाळ हे नाराज होते. त्यांनी माध्यमांसमोर अतिशय भावुक होत प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी म्हातारा झालो, आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिल्याची आठवण सपकाळ यांनी पक्षाला करून दिली. त्याचवेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते.
advertisement

मुलगी महापालिकेसाठी इच्छुक होती पण ठाकरेंनी तिकीट नाकारलं

दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ मधून इच्छुक होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट नाकारल्याने रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली. मुलीला माघार घ्यावी लागल्याने दगडू सपकाळ प्रचंड नाराज झाले होते.

ठाकरेंना जय महाराष्ट्र, हाती धनुष्यबाण घेणार

advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सकपाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली. विचार करून कळवतो, असे सपकाळ यांनी त्यावेळी सांगितले. अखेर विचाराअंती सपकाळ यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

कोण आहेत दगडू सपकाळ?

advertisement
दगडू सपकाळ हे शिवसेनेते अतिशय निष्ठावंत नेते होते
लालबाग परळ भागांत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांचे वजन होते
शिवसेना पक्षाकडून ते आमदारही राहिले होते
त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जबाबदारी होती
मुंबई महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली, अशी त्यांची इच्छा होती
परंतु उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी न दिल्याने दगडू सपकाळ नाराज झाले
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईतल्या सभेदिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कट्टर साथीदारच शिंदेसेनेत प्रवेश करणार!
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement