यंदाची मकर संक्रांत आहे खास, 23 वर्षांनंतर आला दुर्मिळ योग; या चुका टाळाल तर वाढेल पुण्य, लक्ष्मी कृपा होईल

Last Updated:
Makar Sankranti: यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती आणि षट्तिला एकादशीचा दुर्मिळ योग जुळून आला असून, हा संयोग तब्बल 23 वर्षांनंतर घडत आहे. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेसह तुळशीशी संबंधित काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे.
1/9
यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होत असून, याच दिवशी तिळ किंवा षट्तिला एकादशीचाही दुर्मिळ योग जुळून आला आहे. हा संयोग तब्बल 23 वर्षांनंतर तयार होत आहे. याआधी असा योग 2003 साली पाहायला मिळाला होता.

advertisement
2/9
एकादशी ही भगवान श्रीहरि विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. विष्णूंना तुळस अतिशय प्रिय असल्याने या दिवशी तुळशीशी संबंधित काही नियम पाळणं फार महत्त्वाचं असतं. ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार, या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास माता लक्ष्मी अप्रसन्न होण्याची शक्यता असते.

3/9
मकर संक्रांतीच्या दिवशी येणाऱ्या षट्तिला एकादशीला तुळशीबाबत कोणत्या चुका टाळाव्यात, ते जाणून घेऊया.

4/9
षट्तिला एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणं वर्ज्य मानलं जातं. अनेकजण भगवान विष्णूंच्या पूजेसाठी त्याच दिवशी तुळस तोडतात, मात्र हे शास्त्रानुसार योग्य नाही.

5/9
जर पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी तुळशीचा वापर करायचा असेल, तर एक दिवस आधीच पाने तोडून ठेवावीत. पाने तोडताना तुळशीला नम्रपणे प्रणाम करणं आवश्यक आहे.

6/9
एकादशी तिथीला तुळशीच्या रोपाला पाणी घालणं निषिद्ध मानलं जातं. अशी मान्यता आहे की या दिवशी तुळस माता स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे पाणी दिल्यास तिचं व्रत भंग होऊ शकतं.

7/9
विशेषतः एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण केल्यास पूजेचं पुण्य कमी होतं, असं धर्मग्रंथ सांगतात. रविवार आणि ग्रहणकाळातही तुळशीला पाणी देऊ नये.

8/9
एकादशीच्या दिवशी अस्वच्छ हातांनी तुळशीला स्पर्श करणं टाळा. शास्त्रांमध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे अशुद्ध अवस्थेत तुळशीला हात लावल्यास लक्ष्मीदेवी नाराज होऊ शकते.

9/9
या दिवशी घरात मांस, मद्य किंवा तामसिक अन्न वर्ज्य मानलं जातं. घरात स्वच्छता, सात्त्विकता आणि शांत वातावरण ठेवा. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं विशेष फलदायी मानलं जातं.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement