महायुतीचं ठरलं! उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत साताऱ्यातून मोठी बातमी

Last Updated:

Maharashtra Politics : महाविकास आघाडीला टफ फाईट देण्यासाठी भाजपचा प्लॅन! साताऱ्यातून उमेदवार जाहीर. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं होतं. साताऱ्यातील अजित पवार गटाकडील जागा काढून भाजपकडे घेतली होती.

 उदयनराजे
उदयनराजे
तुषार रुपनवार, मुंबई : साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं होतं. साताऱ्यातील अजित पवार गटाकडील जागा काढून भाजपकडे घेतली होती. त्यानंतर उमेदवारी उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र भाजपने (BJP) कोणतीही अधिकृत घोषणा त्यावेळी केली नव्हती. त्यानंतर सलग तीन दिवस उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते.
भाजपने उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून अखेर उमेदवारी (BJP Satara Candidate) जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच उदयनराजे भोसले यांनी आपलं शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता साताऱ्यात कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.
उदयनराजे भोसले सलग तीन दिवस दिल्लीमध्ये होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं होतं, मात्र उमेदवारी मिळणार की नाही याची साशंकता जनतेच्या मनात होती. दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी आपलं शक्तिप्रदर्शन सुरू केलं होतं.
advertisement
दिल्लीतून आल्यानंतरच उदयनराजे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास उघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर का?
उमेदवारी काहीतरी विचार करुन जाहीर केली जाते. महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने मिळून निवडणुका आहेत. तीन पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. साताऱ्यातून उदयनराजे भोसले मोठ्या मतांनी निवडून येतील. साताऱ्याची जनता 100 टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सपोर्ट करतील असा विश्वास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीचं ठरलं! उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत साताऱ्यातून मोठी बातमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement