आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेटीला, शिवतीर्थावर बंद दाराआड चर्चा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत, जागावाटपावर चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात हलचल.
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट होत आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे संकेत मिळत आहेत. एकीकडे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा नारा देत असतानाच, उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी झाल्याचे मानले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावरून संभाव्य चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. विशेषतः, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वपूर्ण आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपाची नेमकी रणनीती काय ठेवायची, यावर विचारविनिमय करण्यासाठीच ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता निर्माण होणे, ही विरोधी पक्षांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.
advertisement
दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांशिवाय ही भेट होत आहे. दोन्ही भावांमध्ये जागावाटपावरुन संभाव्य चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे बंधूंची युती होणार असे संकेत दिसत असले तरीसुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर दोन्ही पक्षांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 12:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेटीला, शिवतीर्थावर बंद दाराआड चर्चा


