छ. संभाजीनगर-पैठण मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर–पैठण मुख्य मार्गावर बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. चित्तेगाव आणि बिडकीन परिसरात सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. रोज दोन ते तीन तास वाहनांची प्रतीक्षा लागल्याने अपघाताचा धोका वाढू लागला आहे. ही परिस्थिती पाहता वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
जड वाहतुकीसाठी नवीन मार्ग
संभाजीनगर - वाळूज - इमामपूरवाडी - रांजणगाव शेकटा - बिडकीन - पैठण जातील.
पैठणहून संभाजीनगरकडे येणारी जड वाहने पैठण - बिडकीन - शेकटा - रांजणगाव - इमामपूरवाडी - वाळूज - संभाजीनगर जातील.
advertisement
कचनेर – बिडकीन – पोरगाव मार्गासाठी कचनेर कमान - राष्ट्रीय महामार्ग 42 - चौफुली निलजगाव - पैठण / पोरगाव जातील.
येताना : पैठण - बिडकीन - निलजगाव - पोरगाव चौफुली - कचनेर कमान - राष्ट्रीय महामार्ग 72 - संभाजीनगर जातील.
गिरनेरा – गेवराई तांडा मार्गासाठी बदल
जाण्यासाठी : संभाजीनगर - गेवराई तांडा - गिरनेरा - पैठण मार्गे जातील.
advertisement
येताना : पैठण - बिडकीन - निलजगाव - बोकूड जळगाव - गिरनेरा तांडा - गेवराई तांडा - संभाजीनगर जातील.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दिलेल्या मार्गांचा वापर करून वाहनचालकांनी सहकार्य करावे, ज्यामुळे रस्ता काम सुरळीत पार पडेल आणि अपघातांची शक्यता कमी राहील.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 27, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगर-पैठण मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी रस्ते









