हृदयद्रावक घटना! भाचीला सोडायला गेला तो परतलाच नाही, गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर, चिमुकली गंभीर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात भरधाव कारच्या धडकेत संशोधकाचा मृत्यू झाला. तर चार वर्षांची चिमुकली गंभीर जखमी आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील बेगमपुरा परिसरात एका भरधाव कार चालकाने दुचाकीला धडक दिली. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विद्युत कॉलनीत झालेल्या या अपघातात अर्थशास्त्र विषयाच्या संशोधक प्राध्यापकाला जीव गमावावा लागला. ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट असे 37 वर्षीय संशोधकाचे नाव असून या अपघातात त्यांची 4 वर्षीय मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे.
ज्ञानेश्वर शिरसाट हे पत्नी आणि मुलीसह शहरात राहत होते. त्यांच्या भाचीचे शिक्षण विद्यापीठात सुरू असून तिला वसतिगृहात सोडून ते परत येत होते. परतीच्या मार्गावर समोरून येणाऱ्या (एमएच 20 एचएच 8252 या) कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीवर आदळली. कारचा वेग इतका प्रचंड होता की ज्ञानेश्वर आणि त्यांची चार वर्षांची मुलगी रस्त्यावर दूरवर फेकले गेले.
advertisement
भरधाव कारची धडक बसताच ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. तिच्या मेंदूला गंभीर मार बसल्याची माहिती मिळते. अपघातानंतर बेगमपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि कार जप्त केली.
advertisement
गर्भवती पत्नीची व्याकूळ प्रतीक्षा
अपघाताच्या रात्री ज्ञानेश्वर यांच्या गर्भवती पत्नी घरी त्यांची आणि मुलीची वाट पाहत शांतपणे बसल्या होत्या. नेहमीच्या वेळेपेक्षा पती उशिरा येत असल्याने त्यांना काळजी वाटू लागली होती. मात्र बाहेर नेमके काय घडले आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. दरम्यान, अपघाताची बातमी त्यांच्या नाजूक परिस्थितीत असलेल्या पत्नीला नेमकी कशी सांगावी? असा भावनिक पेच नातेवाईकांसमोर निर्माण झाला होता.
advertisement
चार दिवसांपूर्वीच खरेदी केली कार
view commentsअपघातानंतर बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ कारचालक शेख करीम शेख (वय 39. रा. कुंभार गल्ली, बेगमपुरा) याला अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस तपासात उघड झाले की अपघातात सहभागी असलेली कार त्याने अवघे चार दिवसांपूर्वीच विकत घेतली होती. नवीन कारचा आनंद घेण्याच्या नादात वेगाने वाहन चालवणे अखेर एका निरपराधाच्या जीवावर उठल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 27, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हृदयद्रावक घटना! भाचीला सोडायला गेला तो परतलाच नाही, गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर, चिमुकली गंभीर


