लग्नाला जाताना काळ आडवा, लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा करुण अंत, छ. संभाजीनगरची घटना

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाला जाताना भीषण अपघात झाला. चिमुकल्या लेकीसमोरच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

लग्नाला जाताना काळ आडवा आला, लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा करुण अंत, छ. संभाजीनगरची घटना
लग्नाला जाताना काळ आडवा आला, लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा करुण अंत, छ. संभाजीनगरची घटना
छत्रपती संभाजीनगर : सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकतीच आपल्या मुलीसोबत लग्नाच्या सोहळ्यासाठी निघालेल्या एका वडिलांचा टेम्पोच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला. 13 वर्षांच्या लेकीसमोरच वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्यावर जिकठाण फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला.
बाबुसिंग सोबकचंद महेर (वय 45, रा. पेंडापूर, ह.मु. ढोरेगाव) हे त्यांची 13 वर्षांची मुलगी आचल बाबूसिंग महेर हिच्यासोबत चाळीसगाव येथील लग्नसमारंभासाठी दुचाकीवरून (एमएच 20, डी यु - 0541) निघाले होते. वडिलांनी हेल्मेटही परिधान केले होते. नियमांचे पालन करूनही नियतीने क्रूर खेळ खेळला. जिकठाण फाटा येथील ग्रीन-पॅक कंपनीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर टेम्पोने (एम एच 20, सी टी-0843) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की, बाबुसिंग महेर यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची निष्पाप मुलगी आचल हिच्या डोळ्यांसमोरच वडिलांना अखेरचा श्वास घ्यावा लागला. तिच्यासाठी हा क्षण काळजाला चिरणारा आणि आयुष्यभरासाठी वेदना देणारा ठरला.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच भोसले अॅम्बुलन्सचे चालक शुभम वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून महेर यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काळजाचा धडका उडवणारी ही घटना 13 वर्षीय मुलीसमोर घडली. वडिलांनी हेल्मेट घातले असतानाही अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा जीव वाचू शकला नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार डी. वाय. अवधूत यांच्या माहितीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
लग्नाला जाताना काळ आडवा, लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा करुण अंत, छ. संभाजीनगरची घटना
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement