Uddhav Thackeray : BMC निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा झटका, नवी मुंबईनंतर भिवंडीत शिंदेंनी पाडलं खिंडार!
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
शिवसेना उबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंनी भिवंडीत मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेआधी ठाकरेंना जबर झटका बसला आहे.
Uddhav Thackeray News: महापालिका निवडणुकीला अवघे काही महिनेच उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची तयारी सूरू केली आहे. नगरसेवक,माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सूरू आहेत. त्यात एकमेकांचे नगरसेवक आपल्या पक्षात वळण्याचे राजकारण देखील सूरू आहेत. अशात आता शिवसेना उबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंनी भिवंडीत मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेआधी ठाकरेंना जबर झटका बसला आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर ठाकरे गटाला घरघर लागली आहे. पराभवाची निराशा आणि आपापसातील मतभेद यामुळे वैतागलेल्या पदाधिकाऱ्यांचा लोंढा शिंदे गटाकडे वळू लागला आहे. अशाच पध्दतीने भिवंडी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराज होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
भिवंडी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर सचिव महेंद्र कुंभारे, दोन्ही विधानसभा संघटक दिलीप नाईक, उमेश कोंडलेकर, दोन्ही विधानसभा सचिव गोकुळ कदम, दिलिप कोंडलेकर, सर्व उपशहरप्रमुख राकेश मोरे, विरेंद्र पाटील, मनोज पाटील, विभागप्रमुख सोमनाथ भोईर, गंगाधर बलांडे, रमेश पवार, शाखाप्रमुख राहुल मोरे, शंकर बेदरकर, दुर्वेन धुमाळ, विराज मोरे, अभिषेक तिवारी, जतीन मोरे, राहुल झा आणि इतर शिवसैनिकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे भिवंडीत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. तर महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
advertisement
नवी मुंबईतही झटका
नवी मुंबईचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी गेल्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
नवी मुंबईत अनेक माजी नगरसेवक ठाकरे गटामध्ये होते. यामध्ये माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. द्वारकानाथ भोईर हे नवी मुंबईत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. रविवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. द्वारकानाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक दयानंद माने, मधूकर राऊत, मेघाली मधूकर राऊत, उपशहर प्रमुख संजय देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
advertisement
दरम्यान विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 95 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण त्यांना अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला. ठाकरेंनी ज्या जागा जिंकल्या त्यात बऱ्यापैकी मुंबईचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिकेत ठाकरेंचं पारडं जड ठरू शकतं, अशा शक्यता आहे. अशात महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी त्यांची साथ सोडत असल्याने विधानसभेनंतर मुंबई महापालिका देखील ठाकरेंच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणींत वाढ होताना दिसत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : BMC निवडणुकीआधी ठाकरेंना मोठा झटका, नवी मुंबईनंतर भिवंडीत शिंदेंनी पाडलं खिंडार!


