Union Budget 2024 : बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी वाचली यादी
- Published by:Shreyas
Last Updated:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली आहे.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं?
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
advertisement
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
या गोष्टी महाराष्ट्राला मिळाल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच याशिवायही राज्याला बरंच काही मिळालं आहे, या फक्त 2/3 विभागांच्या तरतुदी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
advertisement
फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
'विनाकारम नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ नरेटिव्हसाठी काम करू नका. विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया काय द्यायची ते ठरवलेलं आहे. विरोधक खऱ्या बजेटची कॉपी वाचत नाहीत, ते माझी कॉपी काय वाचणार?, जिथे विरोधकांचं राज्य आहे तिथे तरी त्यांनी खटाखट करावं', असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 3:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Union Budget 2024 : बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी वाचली यादी