Navratri 2025 : नवरात्रोत्सवासाठी सगळ्यात हटके दिसायचंय? साडीतून घागरा- चनिया चोली अशी तयार करा...

Last Updated:

Navratri 2025 : मार्केटमध्ये चनिया चोली आणि घागरा चोलीचे डिझाईन्स रंगीबेरंगी पॅटर्नमध्ये उपलब्ध झाले आहेत. मात्र, यांची किंमत साधारण दीड हजार रुपयांपासून सुरू होत असल्याने अनेकांना हा खर्च परवडत नाही.

+
नवरात्रोत्सवासाठी

नवरात्रोत्सवासाठी हटके फॅशन : साडीतून घागरा–चनिया चोली तयार करण्याचा नवा ट्रेंड

मुंबई: नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. मार्केटमध्ये चनिया चोली आणि घागरा चोलीचे डिझाईन्स रंगीबेरंगी पॅटर्नमध्ये उपलब्ध झाले आहेत. मात्र, यांची किंमत साधारण दीड हजार रुपयांपासून सुरू होत असल्याने अनेकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे यंदा नवरात्रीत कमी खर्चात स्टायलिश लुक करायचा असेल, तर घरातल्या साडीपासून घागरा चोली तयार करण्याचा ट्रेंड महिलांमध्ये जोर पकडतो आहे.
घरातल्या कॉटन साडी, बांधणी प्रिंट किंवा हलक्या वजनाच्या साड्या वापरून सहजपणे घागरा शिवता येतो. त्याच साडीतून दुपट्टा आणि छोलीदेखील बनवता येते. विशेष म्हणजे हे डिझाईन केवळ नवरात्रीपुरतेच नव्हे तर लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगासाठीही वापरता येते.
हटके डिझाईन कल्पना
advertisement
  • गळ्याचे पॅटर्न : सध्या व्ही-नेक, बोट-नेक, स्क्वेअर नेक आणि डीप बॅक नेक डिझाईन्स आहेत.
  • घागऱ्याचे स्टाईल्स : अनारकली टाईप, फ्लेअर पॅटर्न, पॅनल कट घागरा हे डिझाईन्स ट्रेंडिंग आहेत.
  • दुपट्ट्याचे स्टाईलिंग : साडीच्या ओढणीवर लेस, मणी, गोटा पट्टी किंवा किनार लावून दुपट्टा अधिक आकर्षक बनवता येतो.
  • ब्लाऊज डिझाईन्स : लेस वर्क, आरी वर्क, मिरर वर्क, मोती-डायमंड एम्ब्रॉईडरीचे ब्लाऊज खूप उठावदार दिसतात.
  • मिक्स अँड मॅच : एक साडी वापरून तयार केलेले घागरा चोली तुम्ही दुसऱ्या साडीच्या दुपट्ट्यासोबतही कॉम्बिनेशन करून घालू शकता.
advertisement
यामुळे प्रत्येक मुलगी आणि महिला आपल्या बजेटमध्ये राहून नवरात्रीत हटके व स्टायलिश लुक करू शकते. शिवाय, साडीपासून बनवलेले आउटफिट्स पूर्णपणे युनिक असल्यामुळे मार्केटमध्ये मिळणाऱ्या रेडीमेड घागऱ्यांपेक्षा वेगळेपण टिकवून ठेवतात
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025 : नवरात्रोत्सवासाठी सगळ्यात हटके दिसायचंय? साडीतून घागरा- चनिया चोली अशी तयार करा...
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement