Weather update: विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे ढग, पुण्यात कधी पडेल पाऊस?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मुंबईत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही, मात्र इथली उष्णता काहीशी कमी झाली आहे. पुणेकरांना मात्र प्रचंड उष्णता सहन करावी लागणार आहे.
पनारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : फेब्रुवारी महिनाअखेरीपासून सुरू झालेल्या उन्हाच्या झळा काही थंड होण्याचं नावच घेत नाहीयेत. त्यातच विदर्भ आणि मराठवाडावासियांना काहीसा दिलासा मिळाला. कारण इथल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे घामाच्या धारांपासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र हाल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत, त्यात आता राज्यात पुढील काही दिवसही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे असणार आहेत.
advertisement
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. यामुळे आतापासूनच हवेत गारवा निर्माण झाला असून अनेक शहरांमधील तापमानात घसरण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून मराठवाड्यात आतापर्यंत जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये वादळी पाऊस झाला, तर विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला.
advertisement
मुंबईत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही, मात्र इथली उष्णता काहीशी कमी झाली आहे. 13 एप्रिल रोजी मुंबईत 33 अंश डिग्री सेल्सियस एवढं तापमान असेल. तर, पुणेकरांना मात्र प्रचंड उष्णता सहन करावी लागेल. 13 एप्रिल रोजी इथलं कमाल तापमान 40 अंश डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 20 अंश डिग्री सेल्सियस एवढं असेल. तर, 15 एप्रिलपासून मात्र 4 दिवस पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने छत्रपती संभाजी नगरच्या तापमानात घट झालीये. 13 एप्रिल रोजी इथलं तापमान 34 अंश डिग्री सेल्सियस एवढं असेल. तर, मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे नागपूरमधील तापमानातही मोठी घट झालीये. 13 एप्रिल रोजी इथलं कमाल तापमान 33 अंश डिग्री सेल्सियस एवढं असेल. तर, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी 36 अंश डिग्री सेल्सियस कमाल तापमान असण्याचा अंदाज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2024 7:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather update: विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे ढग, पुण्यात कधी पडेल पाऊस?

