उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे 200 पर्यटक अडकले, VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकले आहेत, त्यात 50 मुंबईतील आहेत. यमुनोत्री धाम रस्ता बंद करण्यात आला असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आहे. या पर्यटकांमध्ये 50 जण मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे. गाड्या वाहून गेल्या, काही घरांमध्ये पाणी शिरलं, तर काही ठिकाणी पत्त्याच्या बंगल्यासारखी घरं जमीनदोस्त झाली. पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. या पावसामुळे महापूर आला आहे.
यमुनोत्री इथे सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसात अनेक यात्रेकडू अडकले आहेत. त्यापैकी 200 महाराष्ट्रातील पर्यटक असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत.
Uttarakhand Heavy Rain: यमुनोत्री धाम रूट को आज प्रशासन ने किया बंद.. | Latest News Update | Weather#UttarakhandWeather #Yamunotri #News18India | @imonicathakur @deepakbishtNews pic.twitter.com/KmRmGU1i2x
— News18 India (@News18India) July 1, 2025
advertisement
अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमुळे अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूप बिकट असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील 200 पर्यटकांमध्ये मुंबईतील 50 असल्याचं सांगितलं जात आहे, उर्वरित पर्यटक कुठले आहेत याची सध्या माहिती मिळू शकली नाही. मात्र त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचाव पथक रवाना झालं आहे.
advertisement
यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचल्याने 600 पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे. यमुनोत्री धाम रस्ता प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासासाठी बंद केला आहे. तर जागोजागी हायअलर्ट देखील जारी केला आहे.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
July 01, 2025 11:02 AM IST