Pune Airport : पुणेकरांना लॉटरी! 'या' मोठ्या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी थेट विमानसेवा होणार सुरू; जाणून घ्या तारीख

Last Updated:

Pune To AbuDhabi Direct Flight : पुणे विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेस पुणे ते अबू धाबी थेट विमानसेवा सुरू करणार आहे. नेमकी ही सेवा कधी सुरु होणार हे सविस्तर जाणून घेऊयात.

Pune To AbuDhabi Direct Flight
Pune To AbuDhabi Direct Flight
पुणे : पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने शनिवारी या हवाई मार्गाबाबत अधिकृतपणे घोषणा केली.
कसे असेल वेळापत्रक
या सेवेनुसार दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे विमानतळावरून विमान उड्डाण करेल. पुण्यातून विमान रात्री 8.50 वाजता उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री 10.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात अबू धाबीहून विमान रात्री 11.45 वाजता निघेल आणि पहाटे 4.15 वाजता पुण्यात उतरेल.
सध्या पुणे विमानतळावरून दररोज बँकॉक आणि सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी नियमित उड्डाणे सुरू आहेत. पुणेकर प्रवाशांमध्ये युरोप, यूएईसारख्या देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु करण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे आता या नवीन विमानसेवेने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement
पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या विस्तारीकरणाच्या टप्प्यात आहे. नवीन सुविधा पूर्ण झाल्यानंतर विमानांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे हळूहळू वाढवली जातील. एअर इंडिया एक्सप्रेसने आधी सिंगापूर आणि बँकॉकसाठी सेवाही सुरू केली होती आणि आता अबू धाबीचा समावेश केला आहे.
या नवीन उड्डाणामुळे पुणेकरांना अबू धाबीसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी थेट पोहोचण्याचा सोयीस्कर पर्याय मिळेल. प्रवासाच्या वेळापत्रकामुळे रात्री उड्डाण करून सकाळी परतीचा प्रवास पूर्ण होईल जे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport : पुणेकरांना लॉटरी! 'या' मोठ्या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी थेट विमानसेवा होणार सुरू; जाणून घ्या तारीख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement