Vasai Crime : संख्खा मामाचा कंस निघाला! भाचीचा ट्रेनमधून ढकलून जीव का घेतला? खळबळजनक कारण समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वसईत मंगळवारी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची भायंदर नायगाव या पुलावरून जाताना लोकलमधून पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत आता मोठा उलगडा झाला आहे.
Vasai Crime News : वसईत मंगळवारी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची भायंदर नायगाव या पुलावरून जाताना लोकलमधून पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत आता मोठा उलगडा झाला आहे. अल्पवयीन मुलीच्या या मृत्यूमागे आता तिच्या सख्ख्या मामाचा हात असल्याचे समोर आले आहे.या दरम्यान मामाने पोलीस चौकशीत जो जबाब दिला आहे तो पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.त्यामुळे नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे? तो जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार 16 वर्षीय अल्पवयीन भाची ही वसईच्या वालिव परीसरात राहणाऱ्या तिचे मामा कृष्णा सोनी आणि अर्जुन सोनी यांना भेटण्यासाठी आली होती.मात्र घटनेच्या दिवशी ती कुणाला न सांगता घराबाहेर पडली. त्या दिवसापासून भाची बेपत्ता होती. तिच्या कुटुंबातील नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही, त्यानंतर वालीव पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तिच्या मामीने तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्यान मामा अर्जुन सोनी हा अल्पवयीन भाचीला घेऊन भाईंदर येथून विरार फास्ट लोकल ट्रेन पकडून निघाला होता.या दरम्यान लोकल ट्रेन नायगाव - भाईंदर दरम्यान पोहोचल्यानंतर मामा अर्जुन याने भाचीला धावत्या लोकल ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. यात 16 वर्षाच्या कोमलचा मृत्यू झाला. यावेळी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी अर्जुन सोनी याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. रेल्वेतून पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यानं वसई रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली होती. या घटनेत मृत मुलगी वालीव पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता झाल्यानं वालीव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
advertisement
वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मामा अर्जुन सोनी आणि त्याची भाची यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. भाची मामाशी लग्न करण्यास आग्रही होती. मात्र, मामाला हे लग्न करायचं नव्हतं.त्यामुळे आपल्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी आरोपी मामा अर्जुन सोनी याने त्याच्या भाचीला धावत्या लोकल ट्रेनमधून खाली ढकलून तिची हत्या केली, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी दिली. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
November 19, 2025 11:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vasai Crime : संख्खा मामाचा कंस निघाला! भाचीचा ट्रेनमधून ढकलून जीव का घेतला? खळबळजनक कारण समोर


