Kawasaki W230 : जड बुलेट आता विसरा, येतेय तिच्यासारखी दिसणारी अन् वजनाने हलकी Bike, लूकही जबरदस्त
- Published by:Sachin S
Last Updated:
एकापेक्षा एक बुलेट लाँच करून रॉयल एनफिल्डने मार्केटवर आपली पकड कायम ठेवली आहे. आता Kawasaki ने आता बुलेटला टक्कर देणारी हलकी आणि रेटो लूकमध्ये एक दमदार बाईक लाँच केली आहे.
भारतात मागील काही वर्षांपासून रॉयल एनफिल्डने दमदार आणि वजनदार बाईक सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. एकापेक्षा एक बुलेट लाँच करून रॉयल एनफिल्डने मार्केटवर आपली पकड कायम ठेवली आहे. आता Kawasaki ने आता बुलेटला टक्कर देणारी हलकी आणि रेटो लूकमध्ये एक दमदार बाईक लाँच केली आहे. Kawasaki W230 असं या बाईकचं नाव आहे.
advertisement
Kawasaki मोटर्सने रेट्रो रोडस्टर Kawasaki W230 ही बाईक आणली आहे. या बाईकचा लूक हा सेम बुलेटसारखाच आहे. पण, ही बाईक बुलेट पेक्षा वजनाने हलकी आहे. २०२६ मध्ये ही बाईक अधिकृतरित्या लाँच होणार आहे. भारतात सध्या विकल्या जात असलेल्या W175 च्या जागी W230 जागा घेणार आहे. या बाईक चं इंजिन हे 233 cc क्षमतेचं आहे. भारतात ती रॉयल एनफिल्डच्या Royal Enfield Hunter 350 ला थेट टक्कर देईल.
advertisement
Kawasaki W230 बद्दल बोलायचं झालं तर ही एक रेट्रो डिझाईनसह येते, यात गोल हेडलॅम्प, क्रोम-फिनिश्ड इंधन टाकी आणि क्लासिक साइड पॅनेलचा वापर केला आहे. Kawasaki W230 बाईकमध्ये २३३cc चे ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, SOHC, २ व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे. जे अंदाजे १७ hp हॉर्सपॉवर आणि १४.० lb-ft टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनसोबत जोडलेले आहे आणि यामध्ये अँटी-लॉक ब्रेक सिस्टम (ABS) दिलं आहे.
advertisement
Kawasaki W230 चा ग्राउंड क्लीअरन्स ५.९ इंच आणि व्हीलबेस ५५.७ इंच आहे. W230 मध्ये वापरलेले २३३cc चं एअर-कूल्ड इंजिन तेच आहे जे कंपनी त्यांच्या KLX230 मध्ये वापरलंय. रेट्रो-रोडस्टर असल्याने, W230 चे गियरिंग आरामदायक आणि सहज रायडिंग स्टाईलसाठी वेगळ्या पद्धतीने ट्यून केलं आहे. हे इंजिन शहरात आणि हायवेवर प्रवासासाठी बेस्ट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


