Vasai Virar News : आईला म्हणाला 10 मिनिटात घरी येतो अन् आदित्यने मित्रासह उचललं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं!

Last Updated:

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दोन तरूणांनी मिळून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या घटनेपुर्वी मुलाला त्याच्या आईचा फोन आला होता

AI Image
AI Image
Vasai Virar News : विजय देसाई, प्रतिनिधी,विरार : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दोन तरूणांनी मिळून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या घटनेपुर्वी मुलाला त्याच्या आईचा फोन आला होता.यावेळेस त्याने 10 मिनिटात घरी येतो असं सांगितलं होतं. पण मुलगा काय परतला नाही. पण आता त्या मुलाने एका मित्रासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शाम घोरई (वय 20) आदित्य राज सिंग (वय 21) अशी या मुलांचे नावे आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शाम घोरई आणि आदित्य राज सिंग हे दोघेही नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहायचे. दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. घटनेच्या दिवशी सध्याकाळी आदित्य सिंगच्या घरी त्याचा मित्र आला तर बाकी दोन मुले बिल्डिंगच्या खालीच थांबली होती. या सगळ्या मित्रांचा फिरायला जाण्याचा प्लान होता. त्यानंतर ही दोन मुलंही घराबाहेर पडली होती.
advertisement
त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हे दोघेही विरार बोळींज येथे एका इमारतीच्या ठिकाणी गेले होते. उशिराने संध्याकाळी गेल्याने या बांधकामाच्या ठिकाणी कोणताही कामगार नव्हता. त्यावेळी इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोघांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपुर्वी आदित्यला त्याच्या आईचा फोन आला होता. यावेळेस त्याने 10 मिनिटात घरी येतो असे सांगुन फोन ठेवला.पण तासभर उलटल्यानंतरही तो न परतल्याने आणि त्याचा फोन लागत नसल्याने आई बाबांच्या जीवाला घोर लागला. त्यानंतर आई वडिलांनी घराबाहेर पडून मुलांची शोधाशोध घेतली, पण मुलांचा काय शोध लागला नाही. त्यानंतर शेवटी आई वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
advertisement
या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलं फिरायला गेले असतील येतील असा धीर दिला.त्यानंतर थोड्या वेळाने पोलिसांनी पालकांना त्यांच्या मुलांना अर्नाळा येथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याची माहिती दिली. त्यानंतर पालक हॉस्पिटलमध्ये मुलांना पाहायला गेले असता त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली होती.
पण या घटनेनंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. घटनास्थळी संशयास्पद असं काही सापडलं नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी केला आहे. वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
आदित्य सिंगचे वडील राजसिंग या प्रकरणात म्हणाले की, काल संध्याकाळी तीन मुलं राजसिंग यांच्या घरी आली होती दोघेजण खाली थांबले होते आणि एक जण त्यांच्या मुलासोबत घरी आला होता. त्यावेळी या त्याच्यासोबत आलेल्या दोघांनी चला वृंदावन गार्डनला फिरून येऊया घरी चहा पाणी पिऊन जे निघाले त्यानंतर त्यांच्या पत्नीने मुलाला फोन केला असता दहा मिनिटात परत येतो असं सांगितल्याचे रामसिंग यांनी सांगितले आहे. त्यांची पत्नीने पुन्हा संध्याकाळी फोन केला असता त्याचा फोन लागेना झाला त्यानंतर त्यांची पत्नी खूप घाबरली तीन-साडेतीन वाजता तिन्ही मुलांचे फोन बंद येत होते सगळीकडे परिसरात आजूबाजूला शोध शोधून थकले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली.त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातून सांगण्यात आलं की तुम्ही अर्नाळाला या आणि हॉस्पिटलमध्ये मुलांना ऍडमिट केला आहे त्यांना पाहायला या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सांगितलं तर या मुलांनी आत्महत्या केली आहे.ही हत्या एका मुलीच्या कारणाने झाली असावी ही आत्महत्या नसून या दोघांची हत्या असल्याचा आरोप राज सिंग यांनी केला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vasai Virar News : आईला म्हणाला 10 मिनिटात घरी येतो अन् आदित्यने मित्रासह उचललं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं!
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement