जातीव्यवस्थेचा कळस... मुलाचा आंतरजातीय विवाह, वंचितकडून सुनेला तिकीट, जात डोक्यात गेलेल्या सासू आणि दीराचा सेनेत प्रवेश
- Published by:Suraj
Last Updated:
मुलाने विरोधात जाऊन आंतरजातीय लग्न केलं, त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून सुनेला तिकीट मिळाल्यानं सासू आणि दिराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीला वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलंय. मुलाच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आता सुनेला वंचितकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सासू आणि दिराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. OBC समाजाच्या वृशांक चव्हाण यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन मागासवर्गीय मुलींशी आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. कुटुंबात आधीपासूनच त्याला विरोध होता. आता वंचितने उमेदवारी दिल्यानंतर कुटुंबियांकडून उघडपणे विरोध दर्शवला जात आहे.
advertisement
मेहकर इथल्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांना प्रकाश आंबेडकर सर्वेसर्वा असलेल्या वंचित बहुजन आघाडी कडून मेहकर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आलीय. हा मतदारसंघ SCसाठी राखीव असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र ऋतुजा यांच्या सासू आणि दिराचा लग्नामुळे विरोध होताच, आता तो विरोध उघड झाला असून चक्क आपल्या सुनेच्या विरोधात त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
advertisement
पत्नीला सासू आणि दिराने विरोध केला असला तरी पतीने खंबीर साथ दिलीय. पती वृशांक यांनी म्हटलं की, मी पत्नीसोबत आहे. मी आंतरजातीय विवाह करून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली असल्याचा राग आई भावाला आहे. माझ्या आई भावांना मागासवर्गीयांचा तिरस्कार असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचं पतीने म्हटलं. सरकार जरी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत असलं तरी माझ्या घरांच्याचा त्याला कठोर विरोध होता असही वृशांकने सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2024 2:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जातीव्यवस्थेचा कळस... मुलाचा आंतरजातीय विवाह, वंचितकडून सुनेला तिकीट, जात डोक्यात गेलेल्या सासू आणि दीराचा सेनेत प्रवेश


