Beed Walmik Karad: वाल्मिकला कोर्टाचा दणका, कराडने केलेला गुन्हा गंभीर म्हणत न्यायालयाने अर्ज फेटाळला
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
. वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या वाल्मिक कराडने न्यायालयाकडे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन आणि दोषमुक्ती अर्जांवरील पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. वाल्मिक कराड याचा जामीन अर्जाचा देखील निकाल राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सरकारी विशेष वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील विकास खाडे यांनी दिली आहे.
advertisement
वाल्मिकचा अर्ज फेटाळला
वाल्मिक कराडने केलेला गुन्हा गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत बीडच्या न्यायालयाने वाल्मिकला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडला जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्याची कोर्टाची अधिकृत ऑर्डर येणे बाकी आहे. मात्र अर्ज फेटाळल्याची माहिती सरकारी विशेष वकीलांनी दिली आहे.
पुढील सुनावणी 10 सप्टेंबर
advertisement
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन आणि दोषमुक्ती अर्जांवरील सुनावणी न्यायालयाता झाली. इतर आरोपी, ज्यांची संख्या 2 ते 7 आहे, यांनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर मूळ फिर्यादीने आपले म्हणणे सादर न केल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अनुपस्थित होते. पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.
advertisement
9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.
यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता . या प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय मानला जातो.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Walmik Karad: वाल्मिकला कोर्टाचा दणका, कराडने केलेला गुन्हा गंभीर म्हणत न्यायालयाने अर्ज फेटाळला


