Walmik karad : वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणी वाढणार? 'ते' प्रकरण येणार अंगलट
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा, सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली.
Walmik karad News: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयीत असलेले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक धाकवून लुटमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाने सुशील कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आङे.
सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा, सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे.त्यामुळे आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. आता सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 11, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik karad : वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणी वाढणार? 'ते' प्रकरण येणार अंगलट


