Wardha Accident : वर्ध्यात भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झूंज, धक्कादायक घटना

Last Updated:

वर्ध्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण मृत्यूशी झूंज देतोय.

Wardha Accident News
Wardha Accident News
Wardha Accident News : वर्ध्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण मृत्यूशी झूंज देतोय. आयुष मांडवे या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर निखिल मांडवे या तरूणावर उपचार सूरू आहेत. शहीद भगतसिंग चौकात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
वर्ध्याच्या शहीद भगतसिंग चौकात गिट्टी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत आयुष मांडवे या बालकाचा जागीच मृत्यू झाला तर निखिल मांडवे गंभीर जखमी होती त्यामुळे त्याला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो मृत्यूशी झूंज देतोय.
या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. तसेच अपघात होताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.तसेच या अपघातानंतर आरोपी टिप्पर चालकाने पळ काढल्याची माहिती आहे.त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सूरूवात केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वर्ध्याच्या जुनघरे परिवारातील सदस्य कारने नागपूरच्या दिशेने जात होते. या दरम्यान कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळून दुसऱ्या लेनवर गेली होती.त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकला धडक बसली होती. ही धडक इतकी भीषण होती कारचा अक्षरस चक्काचुर झाला होता. या भीषण अपघातात कार मधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत.मृतांमधील तीनही व्यक्ती एकाच कुटुबातील आहेत.त्यामुळे जुनघरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
तुळजापूर नागपूर मार्गावर खडकी नजीक सामाजिक वनिकारणच्या निर्झरी जवळ ही घटना घडली आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटताच ती पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या लेनवर जाताच भरधाव ट्रकने कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील जुनघरे परिवारातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहे.तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिलांचा आणि एका 25 वर्षीय तरूणाचा समावेश आहे. या तिघांचा मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आला आहे.तर दोन जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहेत. या घटनेने जुनघर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha Accident : वर्ध्यात भरधाव टिप्परने दुचाकीला चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याची मृत्यूशी झूंज, धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement