advertisement

सौरपंपाचं पॅनल खराब, थेंब थेंब पाण्यासाठी वणवण, पोरीचा जीव गेला, पाणी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचं धक्कादायक वास्तव

Last Updated:

Yavatmal Girl Lost her Life For Water: काठोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी जमातीचे नागरिक राहतात. इथल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील
जळगाव : काठोडा येथील काही महिलांसह नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलीचा नदीत पडून मृत्यू झाला. हंडाभर पाण्यासाठी पोरीचा जीव गेल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने मोदी सरकारच्या 'हर घर जल' योजनेची चिरफाड केली आहे. एरवी बाष्कळ मुद्द्यांवर दिवसेंदिवस काथ्याकूट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी मुलभूत मुद्द्यांवर संवेदनशील होण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
काठोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी जमातीचे नागरिक राहतात. येथील रहिवाशांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

हँडपंप पुरेसे पाणी देत नसल्याने गावात पाणीटंचाई, गुलाबराव पाटलांची सारवासारव

या सगळ्या प्रकरणावर बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पारधी बेडा हे ४७ घरांचे आणि १५२ लोकवस्तीचे छोटे गाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावात हँडपंप आणि सौरपंपाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सौरपंपाचे एक पॅनल खराब असल्याने आणि हँडपंप पुरेसे पाणी देत नसल्याने गावात पाणीटंचाई जाणवत आहे.
advertisement

पाणीपुरवठा योजनेचे काम ६० ते ६५ टक्के पूर्ण

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे गाव एका मोठ्या ग्रामपंचायतीचा भाग असून, तिथे ४३ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे आणि जवळपास ६० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

चौकशीचे आदेश, दोषी आढळले तर कडक कारवाई करू 

काही लोकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगी डोहाकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, ही माहिती अधिकृत मानली नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीमध्ये जर कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा यंत्रणेची निष्काळजीपणा आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाला दिल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सौरपंपाचं पॅनल खराब, थेंब थेंब पाण्यासाठी वणवण, पोरीचा जीव गेला, पाणी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राचं धक्कादायक वास्तव
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement