Amravati Eaclection: 'खुलेआम गद्दारी केली, आम्हाला पाडलं' नवनीत राणांना पक्षातून काढा, भाजपच्या 22 उमेदवारांचं थेट CM फडणवीसांना पत्र
- Reported by:SANJAY SHENDE
- Published by:Sachin S
Last Updated:
"नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत.
अमरावती : महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. पण अमरावती महापालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. "शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या, त्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासीत करा" अशी मागणीच भाजपच्या पराभूत २२ उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अमरावती महापालिकेचा निकाल जाहीर झाला. एकूण ८७ जागांपासून 25 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, बहुमतासाठी युवा स्वाभिमानी पक्षाची मदत लागणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक नगरसेवक पराभूत झाले. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपसोबत युती न करत स्वबळावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. अखेरीस पराभूत झालेले 22 उमेदवारांची खदखद अखेर बाहेर आली आहे. 'आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी केला आहे" असं म्हणत २२ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आाहे.
advertisement
'भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी करून केला आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केलं आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचं नियोजन केलं. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचं पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हतं. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या, असा आरोप भाजपच्या २२ उमेदवारांनी पत्रात केला आहे.
advertisement
"नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला, असा आरोपही या उमेदवारांनी केला.
advertisement
आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी झोकून कााम केलं.. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्यानं मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला स्टार प्रचारक' भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचं काम राणा दाम्पत्यानं केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी गद्दारी करून केला, असंही या पत्रात म्हटलं आहे.
advertisement
'यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका'
'म्हणून कळकळीने आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की, एखादा पराजय झाला तरी चालेल पण यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका, नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा यांनी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस संपवली होती. लोकांना पुन्हा पक्ष उभा करायला दहा वर्ष लागले. भाजपा वाचवा ही आमची विनंती आहे. आमच्या पैकी काही सहकारी विजयी झाले आहेत. पण त्यांना हरवण्यासाठी देखील नवनीत राणा यांनी प्रयत्न केला, असा आरोपही या पत्रात उमेदवारांनी केला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 6:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati Eaclection: 'खुलेआम गद्दारी केली, आम्हाला पाडलं' नवनीत राणांना पक्षातून काढा, भाजपच्या 22 उमेदवारांचं थेट CM फडणवीसांना पत्र








