advertisement

FYJC Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाचं अपडेट; विद्यार्थी, पालकांनी काय घ्यावी काळजी?

Last Updated:

FYJC Admission: यंदा राज्यात केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया होत आहे. या काळात विद्यार्थी आणि पालकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

+
FYJC

FYJC Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाचं अपडेट; विद्यार्थी, पालकांनी काय घ्यावी काळजी?

अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू झाली. यंदा 11 वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. अशातच अचानक तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ बंद पडले आणि प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा झाला. आता 26 मेपासून पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबत अहिल्यानगर येथील प्राचार्य शरद गमे यांनी माहिती दिलीये.
दहावीचा निकाल 13 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने लागला आणि आता 11 प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येत आहे. याआधी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही फक्त मेट्रो सिटीत राबवण्यात येत होती. परंतु यावर्षीपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून नाव नोंदणी करून विविध शाखेचे प्रवेश होणार आहेत.
advertisement
26 मेपासून 3 फेऱ्यांत प्रवेश
शासनाच्या धोरणानुसार 19 मे पासून ऑनलाईन नाव नोंदणी होणार होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया आता 26 मे पासून 9 जून पर्यंत होणार आहे. त्यात प्रथम फेरी, द्वितीय फेरी, तृतीय फेरी आणि शून्य फेरी म्हणजेच राहिलेले सर्व प्रवेश होणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सर्व महाविद्यालयांना बंधनकारक असणार आहेत. त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.
advertisement
दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेताना संपूर्ण माहिती घेऊनच चांगल्या कॉलेजची निवड केली पाहिजे. 10 वीनंतर अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, याबाबत मुलांमध्ये गोंधळ होतो. त्यासाठी मुलांनी आपली आवड व गुणवत्ता बघून प्रवेश घेतला पाहिजे, असेही प्राचार्य गमे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
FYJC Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाचं अपडेट; विद्यार्थी, पालकांनी काय घ्यावी काळजी?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement