काँग्रेसने जिस डाली पर नजर डाली..., लाडक्या बहिणीकडून ऐका महायुतीच्या विजयाचं गुपित
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात दणदणीत यश मिळालं आहे. 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावं लागलं.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात दणदणीत यश मिळालं आहे. 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाली होती. महायुतीच्या या विजयात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा होता, असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे.
महायुतीच्या या विजयानंतर एका लाडक्या बहिणीने महायुतीच्या विजयाचं कारण सांगितलं आहे. हे कारण सांगताना या महिलेने काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. 'डाली डाली काट डाली, काँग्रेस ने जिस डाली पर नजर डाली, वही डाली काट डाली', असा टोला या बहिणीने काँग्रेसला लगावला आहे.
advertisement
'महिलांना गॅस आला, म्हणजे ज्या योजना आहेत, तेवढ्या सर्व योजना घरपोच आल्या. डाली डाली काँग्रेसने महायुतीमे नजर डाली, वही डाली लाडकी बहीणने काट डाली', असं ही महिला म्हणाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2024 10:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसने जिस डाली पर नजर डाली..., लाडक्या बहिणीकडून ऐका महायुतीच्या विजयाचं गुपित


