Maharashtra Politics : राज्याला तिसरे उपमुख्यमंत्री मिळणार? गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत, फडणवीसांनी ठरवलं तर...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics : राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भूकंप येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक: मागील काही वर्षात राज्यात मोठ्या घडामोडी घ़डत आहेत. राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे जुळली तर, पक्षांमध्ये फूट प़डली. राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भूकंप येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर राज्याला उपमुख्यमंत्री मिळू शकतो, असे त्यांनी म्हटले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांतर कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले. भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाशिक जिल्ह्याच्या वाटेला आणखी एक मंत्रीपद आले.
त्यामुळे, आता भुजबळ देखील नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर देखील दावा करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच आता भाजपचे 'संकटमोचक' मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
गिरीश महाजन काय म्हणाले?
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भुजबळांच्या दाव्याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता, त्यांनी म्हटले की, असा दावा करणं काही वाईट आहे का, असा सवाल केला. त्यानंतर महाजन यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. ते तिसरे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की कोणाला पालकमंत्री आणि कोणाला उपमुख्यमंत्री करायचं?", असं म्हणतं महाजन यांनी पालकमंत्रिपदाच्या वक्तव्यावर भाष्य केले.
advertisement
पालकमंत्रिपदावरून वाद चिघळणार?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात तिढा आहे. तर, नाशिक पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्येच दावे-प्रतिदावे रंगले आहेत. अशातच आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 25, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : राज्याला तिसरे उपमुख्यमंत्री मिळणार? गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत, फडणवीसांनी ठरवलं तर...