मेडल, युनिफॉर्म अन् गन, सगळं असली, पण... संभाजीनगरच्या महिलेचे लष्कराच्या वर्दीत काळे कारनामे!

Last Updated:

लष्कराचा युनिफॉर्म, मेडल तसंच हत्यारं सोबत घेऊन फोटो काढणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही महिला आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून अनेक कार्यक्रमांमध्ये हजर राहायची.

मेडल, युनिफॉर्म अन् गन, सगळं असली, पण... संभाजीनगरच्या महिलेचे लष्कराच्या वर्दीत काळे कारनामे!
मेडल, युनिफॉर्म अन् गन, सगळं असली, पण... संभाजीनगरच्या महिलेचे लष्कराच्या वर्दीत काळे कारनामे!
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर पोलिसांनी एका 48 वर्षांच्या महिलेला ताब्यात घेतलं आहे, जिने स्वत:ला आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली आहे. या महिलेचं नाव रुचिका जैन असं आहे. ही महिला अनेक कार्यक्रमांमध्ये 'कॅप्टन' बनून जायची आणि लष्कराची वर्दी घालून फोटो काढायची.

युनिफॉर्म, बॅज सगळं मिळालं

दौलताबाद पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरूवात केली तेव्हा महिलेजवळ अशा गोष्टी मिळाल्या ज्यामुळे तिचं पितळ उघडं पडलं. पोलिसांना महिलेच्या घरातून लष्कराचा युनिफॉर्म, पॅरा लिहिलेला बॅज आणि तीन स्टार असलेलं चिन्ह मिळालं आहे. हे तेच स्टार आहेत जे लष्करामध्ये रँक दाखवण्यासाठी वापरले जातात. एवढच नाही तर पोलिसांना महिलेच्या घरातून एक नेमप्लेटही सापडली आहे, ज्यावर कॅप्टन रुचिका जैन, असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं.
advertisement

अवॉर्ड, मेडल आणि खोटी प्रतिष्ठा

महिलेने स्वत:ला आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांच्या आमंत्रण पत्रिकांमध्ये महिलेचं नाव कॅप्टन म्हणून छापलं जायचं. महिलेच्या घरातून चार मेडल, अनेक अवॉर्ड, मेमेंटो आणि आमंत्रण पत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. एवढच नाही तर महिलेचे लष्कराची वर्दी घालून काढलेले फोटोही सापडले आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून ही महिला समाजामध्ये बोगस कॅप्टन बनून मिरवत होती आणि लोकांना फसवत होती.
advertisement

हत्यारही केलं जप्त

पोलिसांना महिलेच्या घरातून फक्त मेडल आणि अवॉर्डच नाही, तर हत्यारही सापडलं आहे, ज्यात एक एअर पिस्टल आणि एका एअर गनचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पिस्टलवर 'नो लायसन्स रिक्वायर्ड' असं लिहिलं आहे. या हत्यारांचा वापर कुठे आणि कसा केला गेला? तसंच महिलेकडे ही हत्यारं कशी आली? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या दौलताबाद पोलिसांनी रुचिका जैनला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुचिका जैनने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मेडल, युनिफॉर्म अन् गन, सगळं असली, पण... संभाजीनगरच्या महिलेचे लष्कराच्या वर्दीत काळे कारनामे!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement